एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Raigad Rains : नरवीर तानाजी मालुसरे यांची शस्त्रं ज्या झाडात सापडली ते अवाढव्य झाड कोसळलं

Raigad Rains : इतिहासाची साक्ष देणारा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराच्या परिसरातील आणि आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ निधड्या छातीने उभं असणारं अवाढव्य वृक्ष कोसळलं.

Raigad Rains : 350 वर्ष ज्याने शिवकाळ अनुभवला, ज्याने दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास अनुभवला तो इतिहासाची साक्ष देणारा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराच्या परिसरातील आणि आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ निधड्या छातीने उभं असणारं अवाढव्य वृक्ष कोसळलं. रायगड जिल्ह्यातील उमरठ इथलं हे आंब्याचं झाड होतं.

कोकणात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने आज (14 जुलै) हे आंब्याचं वृक्ष कोलमडून पडलं. सुदैवाने जवळपास कोणी नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु स्मारक परिसराला असणाऱ्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.
 
मावळाच म्हणावं लागेल असं वृक्ष म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या काळातील आंब्याचे झाड. याच आंब्याच्या ढोलीमध्ये शिवकालीन शस्त्र सापडली होती. या आंब्याच्या झाडाची फळं साखरेप्रमाणे गोड होती, त्यामुळे पंचक्रोशीत या झाडाची साखरगोटी म्हणूनही ओळख होती. उमरठ येथे येणाऱ्या प्रत्येक नरवीर प्रेमींनी हे आंब्याचे झाड आणि त्याच्या ढोलीत सापडलेली तलवार आणि दांडपट्टा पाहिला असेलच.
 
अखंड 350 वर्षापेक्षा जास्त काळ निधड्या छातीने उभं असलेलं हे झाड आज कोसळल्याने अनेकांनी हळहळ देखील व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा मावळा हरपल्याची भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ
कोकणातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस होत असून भारतीय हवामान खात्याकडून आजही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात 13 जुलै मध्यरात्रीपासून सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी ७६ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने दिली. मुसळधार पाऊस कोसळल्याने सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याआधीच प्रशासनाकडून दरड कोसळण्याचा सर्वाधिक धोका जाणवत असून अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्यानंतर उर्वरित गावांना देखील सतर्कतेचा इशारा आपत्ती व्यवस्थापन मंडळाकडून देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget