(Source: ECI | ABP NEWS)
Bhandara : भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव, तर महायुतीतील प्रफुल्ल पटेलांच्या पॅनलचा 11 जागांवर दणदणीत विजय
Bhandara : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 21 पैकी 15 जागांचा निकाल घोषित झालेला आहे. यात काँग्रेसचे नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलला 4 जागांवर विजय झाला असून त्यांचा मोठा पराभव झाला आहे.

Bhandara District Bank Election: भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 21 पैकी 15 जागांचा निकाल घोषित झालेला आहे. यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या परिवर्तन पॅनलला 4 जागांवर विजय झाला असून त्यांचा मोठा पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणाऱ्या सहकार पॅनलने 11 जागांवर विजय मिळवला आहे. 21 पैकी सहा जागांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबला असून उद्या (29 जुलै) न्यायालय काय निर्णय देते त्यानंतर त्याचा निकाल समोर येईल. मात्र महायुतीच्या सहकार पॅनलनं 11 जागांवर विजय मिळविल्याने त्यांची बँकेवर सत्ता बसेल हे निश्चित झालं आहे. काँग्रेसचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांचा दूध संघाच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील फुंडे यांनी दारुण पराभव केला, हे या निवडणुकीचं विशेष मानलं जात आहे.
भंडारा जिल्हा बँक निवडणुकीत 98 टक्के मतदान
तब्बल 9 वर्षांच्या प्रदीर्घ मुदतीनंतर भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Bhandara District Bank Election) निवडणूक अखेर पार पडली. 21 संचालक या निवडणुकीत मतदारांना निवडून द्यायचं असून 1062 मतदारांपैकी 1039 मतदारांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावला. 23 मतदारांनी मतदानाकडं पाठ फिरवल्यानं या निवडणुकीची मतदान टक्केवारी 98 टक्केवारी झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार डॉ प्रशांत पडोळे हे दूध संघाच्या मतदारसंघातून निवडणूक लढत असून त्यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान बँक अध्यक्ष सुनील फुंडे यांच्याशी होती. काँग्रेसचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांचा दूध संघाच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील फुंडे यांनी दारुण पराभव केला आहे.
मध्यवर्ती सहकारी बँकेचा 21 पैकी 15 जागांचा निकाल घोषित
यासोबतच माजी राज्यमंत्री नाना पंचबूधे हे ही या निवडणुकीच्या रणांगणात उभे आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं परिवर्तन पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचं सहकार पॅनल एकमेकांसमोर उभे आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांच्या तगड्या बंदोबस्ता मतदानपेटी पोलीस मुख्यालयात नेण्यात आल्या. दरम्यान, मध्यवर्ती सहकारी बँकेचा 21 पैकी 15 जागांचा निकाल घोषित झालेला आहे. यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलला 4 जागांवर विजय झाला असून त्यांचा मोठा पराभव झाला आहे.
आणखी वाचा
























