एक्स्प्लोर

Bhagat Singh Koshyari: कंगना मला भेटायला आली मग त्यांचा जळफळाट का? माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सवाल

अभिनेत्री कंगना रनौतबद्दल (Kangana Ranaut) प्रश्न विचारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले,  'कंगना रनौत माझ्या मुलीसारखी आहे.'

Bhagat Singh Koshyari: कंगना मला भेटायला आली, मग यांचा जळफळाट का झाला? असा सवाल राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विचारला. कंगना माझ्या मुलीसारखी आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांना अभिनेत्री कंगना रनौतबद्दल (Kangana Ranaut) प्रश्न विचारल्यानंतर हे वक्तव्य केलं. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

कंगना रनौत ही राज्य सरकारच्या विरोधात बोलत होती, तरी तिला भगतसिंह कोश्यारी यांनी सपोर्ट केला, असा आरोप कोश्यारी यांच्यावर करण्यात आला होता. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर भगतसिंह कोश्यारी  म्हणाले, "असे आरोप करणारे जरी माझ्याकडे आले, तरी त्यांना मी भेटण्यास मनाई करेल का? ते काय 302 चे आरोपी आहेत का?  कंगना ही अभिनेत्री आहे, माझ्या मुलीसारखी आहे. तिची तक्रार होती, ती मी ऐकली. कंगना मला भेटायला आली तर इतरांना वाईट का वाटावं? कंगना माझ्याकडे आल्यानं त्यांचा जळफळाट का?  कंगना रनौत माझ्या मुलीसारखी आहे."

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर कंगनानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'थोड्या वेळापूर्वी मी महाराष्ट्राचे  श्री भगतसिंग कोश्यारीजी यांची भेट घेतली. मी त्यांना माझा दृष्टिकोन समजावून सांगितला आणि मला न्याय द्यावा अशी विनंतीही केली, ज्यामुळे सामान्य नागरिकांचा आणि विशेषतः मुलींचा व्यवस्थेवरचा विश्वास परत येईल'

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाचे चित्रपट 

कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.  तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच चंद्रमुखी-2 या चित्रपटामध्ये ती प्रमुख भूमिका साकारणार आहे, असंही म्हटलं जात आहे.  मणिकर्णिका: क्विन ऑफ झाँसी, थलाईवी यांसारख्या चित्रपटांमध्ये कंगनानं काम केलं आहे. कंगना ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं शेअर करते. तिची वक्तव्य अनेकांचे लक्ष वेधतात. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. कंगना तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kangana Ranaut: उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला कंगनानं दिलं उत्तर; म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election 2026 : कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Embed widget