Kangana Ranaut: उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला कंगनानं दिलं उत्तर; म्हणाली...
#askkangana हा हॅशटॅग वापरुन अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनानं शाहरुख खानप्रमाणेच (Shah Rukh Khan) आता ट्विटरवरील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. #askkangana हा हॅशटॅग वापरुन अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्यांचे प्रश्न
कंगाना रनौतला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला,'जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना ऐकता तेव्हा तुम्ही काय विचार करता?' नेटकऱ्याच्या या प्रश्नाला युझरनं उत्तर दिलं, 'अले अले....सो स्वीट' कंगनाच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Ole ole …. Shooo shoo shweet… https://t.co/37p4wbNpmR
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 20, 2023
कंगना रनौतला राजकारणाबद्दल देखील एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला. 'तू राजकारणात कधी प्रवेश घेणार?' असा प्रश्न एका नेटकऱ्यांनं कंगनाला विचारला. या प्रश्नाला उत्तर देत कंगना म्हणाली, 'मी अजून काही बोलू शकत नाही. मी सध्या कलाकार म्हणूनच काम करु इच्छिते'
I am not sure …. I want to do more work as an artist #askkangana https://t.co/AiCjjKHSSI
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 20, 2023
कंगनाच्या चाहत्यानं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 'दुसऱ्यांचा नाश पाहून आनंदी व्हाव, अशी व्यक्ती मी नाही. नीच आणि दयनीय लोकांना असं वाटतं. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळत आहेत.' असा रिप्लाय कंगनानं नेटकऱ्यानं विचारलेल्या प्रश्नाला दिला.
One must never feel vindicated to see other’s doom, lowly, pathetic people feel that way, i am not that kind of a person, I just see them reaping the fruits of their karma… I tend to observe and contemplate a lot keeping my own emotions aside #askkangana https://t.co/ZOmoC1rt8h
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 20, 2023
कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच चंद्रमुखी-2 या चित्रपटामध्ये ती प्रमुख भूमिका साकारणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: