Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाले..
Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही सुरू आहे. यावर पहिल्यांदाच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं मौन सोडलं आहे.
Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही सुरू आहे. यावर पहिल्यांदाच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं मौन सोडलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी बोलत होते.
Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: 'रात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे आमदारांची लिस्ट घेऊन आले'
पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ''देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे लिस्ट घेऊन आले. त्यांनी सांगितलं आम्ही बहुमत सिद्ध करू. मीही म्हटलं, ठीक आहे. कारण घटनेत दिलेल्या निर्देशानुसार विधनासभेत बहुमत सिद्ध केलं जातं. बहुमत राज्यपालांसमोर किंवा राष्ट्रपतींसमोर जाऊन सिद्ध केलं जात नाही. यात दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे मीही म्हटलं, तुम्ही शपथ घ्या आणि बहुमत सिद्ध करा. यात माझं कुठं चुकलं? कोणी संविधान तज्ज्ञ असेल तर त्यांनी यात काय चुकलंय ते सांगावं.''
महाविकस आघाडी दावा करत होती की, राज्यपालांनी इतकी घाई का केली? आम्हाला का नाही संधी दिली, असा प्रश्न भगतसिंह कोश्यारी यांना केला असता ते म्हणाले आहेत की, ''माझ्याकडे जेव्हा त्यांच्याच पक्षाचा एक प्रमुख नेता (अजित पवार) येऊन याबद्दल बोलतो. तर मला असं वाटतं यानंतर त्यांना (महाविकस आघाडीला) बोलण्याचा कोणताच अधिकार राहत नाही. तुम्ही मला सांगत आहात (मविआ), ती व्यक्ती जर इतकी महत्वाची नसती, मग त्यांनी त्या व्यक्तीला इतकं महत्व का दिलं? त्याला उपमुख्यमंत्री बनवलं?,''
Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: ''माझे कुणाशीही संबंध खराब झाले नाही.''
भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, यानंतरही माझे कुणाशीही संबंध खराब झाले नाही. भुजबळ, अजित पवार सर्वांशी संबंध चांगले आहेत. आदित्य ठाकरे तर मला माझ्या मुलासारखे आहेत. ते म्हणाले, मी चांगल्या वाईटासाठी काम करत नाही. मी कामासाठी काम करतो. महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, जिथे त्यांची चूक झाली तिथे मी बोललो.
इतर महत्वाची बातमी: