एक्स्प्लोर

Santosh Deshmukh : वाल्मिक कराडला मोक्का लावा अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार; मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा, धनंजय देशमुखही टॉवरवर चढून आंदोलन करणार

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना झाला तरीही वाल्मिक कराडला आरोपी करण्यात येत नाही, त्याला मोक्का लावण्यात येत नाही असा आरोप देशमुख कुटुंबीयांकडून केला जात आहे. 

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख हे सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी मंगळवारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करावे आणि त्यालाही मोक्का लावण्यात यावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे पाऊल उचलणार आहेत.  

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना दिली जात नाही. खंडणीप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केलं जात नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना मोक्का लावण्यात आला. पण त्याला मोक्का लावण्यात येत नाही अशी तक्रार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला मोक्का लावा या मागणीसाठी गावकरी बुधवारी दिवशी सकाळी 10 वाजता सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.

संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मस्साजोगचे गावकरी हे एकत्रित जमले आणि त्यांनी बुधवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. 

वाल्मिक कराडवर मोक्का का लावत नाही? 

 खंडणी प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी धनंजय देशमुखांची मागणी आहे. वाल्मिक कराडवर हत्येप्रकरणी कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थही मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. 

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होऊन गेला. त्याच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. यात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले. या प्रकरणात वाल्मिक कराडने भरपूर संपत्ती जमावली, त्याच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. 

सुरेश धस यांनी थेट नाव घेतलं नसलं, तरी आकाच्याआडून धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.  यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरू केलं आहे. आता माझ्यावर केसेसचा सपाटा लावल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच 25 जानेवारीच्या उपोषणानंतर त्यांना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special ReportEknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special ReportSupriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget