एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी 17 जूनला रंगणार युक्तिवाद, उज्ज्वल निकमांची मोठी मागणी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला. तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं. तर वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे.

आज 50 मिनिटे सुनावणी

तर आरोपीच्या वकिलांनी आम्ही डिस्चार्ज ॲप्लीकेशनवर अपयशी ठरलो तर पुढील प्रक्रिया करू असा युक्तीवाद केला आहे. अद्यापही डिजिटल ॲव्हिडन्स मिळाले नाहीत, असा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. बऱ्याच अर्जावर दोन्ही पक्षाचे म्हणणे बाकी आहे. डिस्चार्ज ॲप्लीकेशनवर तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाचे म्हणणे आले आहे. त्यामुळे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे की, आधी चार्ज फ्रेम म्हणणेवर सुनावणी घ्या. आज 50 मिनिटे सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या मालमत्ता जप्तीच्या अर्ज केला असल्याची माहिती आहे. पुढच्या सुनावणीवेळी कराडला दोषमुक्त करावे किंवा आरोप निश्चित करावे याबाबत 17 तारखेला पुढील युक्तिवाद होईल. 

गेल्या सुनावणीवेळी काय झालं?

मागील झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल एव्हिडन्सची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप या प्रकरणातील डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. 

विकास खाडे वाल्मीक कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया

आज सुनावणी झाली डिस्चार्ज अप्लिकेशनवर सुनावणी अपेक्षित होती पण ती झाली नाही. आज काही किरकोळ अर्जावर सरकारी पक्षाचे व आमचे म्हणणे मांडले गेले. इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मागत होतो ते कोर्टात सीलबंद पद्धतीने सादर करणार असल्याचं सरकारी पक्षाने सांगितले आहे. ज्यावेळेस पुरावे सादर करतील त्यावेळेस त्यावर चर्चा होईल. सरकारी पक्षाकडून विरोधी आरोपीच्या वकिलांना कागदपत्राची पूर्तता अद्याप झालेली नाही अशी आरोपीच्या वकिलाची माहिती आहे. 

मोहन यादव काय म्हणाले?

डिस्चार्ज ॲप्लीकेशनच्या सुनावणीला वेळ लागू शकतो. येणाऱ्या तारखेला कोर्टात इतर अर्ज जे पेंडीग आहेत त्यावर सुनावणी होणार आहे. डिस्चार्ज ॲप्लीकेशनवर सुनावणी घेण्याअगोदर इतर अर्जावर सुनावणी घ्या असं कोर्टाचं निरीक्षण आहे. सरकारी पक्षाच्या वकिलाने मालमत्ता जप्ती संदर्भात अर्ज केले आहेत. कोर्टाच्या निरीक्षणानुसार 17 तारखेला इतर अर्जावर एकत्रितपणे सुनावणी होणार असल्याची माहिती वाल्मीक कराडचे वकील मोहन यादव यांनी दिली आहे. 

 उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले?

आरोपी वाल्मीक कराडची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज दिला होता. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उत्तर दिले आहे. त्यावर 17 तारखेला सुनावणी होईल. या खटल्यात मोकोकामधून दोषमुक्त करावे असा अर्ज कराड याचा होता. त्यावर न्यायालयात प्रस्तावीत केले आहे. त्याला दोषमुक्त करावे किंवा त्यावर आरोप निश्चित करावे त्या प्रमाणे आम्ही निर्णय घ्यायचा ते एकत्रित सुनावणीत घ्यावा असे म्हटले आहे. बचाव पक्षाने मोकोका मधून मुक्त करावे अशी मागणी केली आहे. आमची या बाबतच्या चौकशीवर हरकत नसल्याचे आम्ही म्हटले आहे. यावर 17 तारखेला युक्तिवाद होईल. केवळ वाल्मीक कराडनेच दोष मुक्तीचा अर्ज केला आहे, अशी माहिती देखील  उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
Beed Crime News: 'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
Beed Crime News: केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
Beed Crime News: ‘ती’ पतीसोबत घरामध्ये झोपलेली, नराधमानं रात्री घरात घुसून उचलून नदीवर नेलं अन्... अत्याचारानंतर डांबलं, घटनेनं बीड हादरलं
‘ती’ पतीसोबत घरामध्ये झोपलेली, नराधमानं रात्री घरात घुसून उचलून नदीवर नेलं अन्... अत्याचारानंतर डांबलं, घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget