एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: बीडची कायदा सुव्यवस्था सरळ करणार, कडक शिस्तीचा IPS आता पदभार घेणार, कोण आहेत नवनीत कांवत?

Who is Beed new SP Navneet Kanwat : बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदल करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे.

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत तर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणी आज उठवला आहे. या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याचे सांगितले होते. तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदल करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनीत कांवत (Navneet Kanwat) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोण आहेत बीडचे नवे SP नवनीत कांवत? 

नवनीत 2017 बॅचचे IPS आहेत. नवनीत कांवत हे मूळचे राजस्थानचे आहेत. नवनीत कांवत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. कांवत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं. सहावी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे झालं. नवनीत कांवत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी, 11वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्वत:वर विश्वास ठेवून दहावीत टॉप केलं, तेव्हापासून स्वत:वरचा विश्वास वाढला.12 वीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे त्यांनी बी टेक केलं. आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले, पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता. नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर, त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे त्यांनी अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS बनले. त्यांची नियुक्ती आता बीडमध्ये करण्यात आली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात काय म्हटलं? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की, बीडच्या प्रकरणात ज्यांचा समावेश असेल, मग तो भूमाफिया असेल, तरी त्यांच्यावर मकोका लावू. मी पोलिस महासंचालकांना देखील सांगितले की, यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय, हे बघायला पाहिजे. मधल्या काळात हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात. हे यापुढे सहन केले जाणार नाही, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो. या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत. एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू. जी प्रकरणे समोर येत आहेत, त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे, असे त्यांनी म्हटले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget