एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या सभेपूर्वी बीडमधील 125 मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस

Beed : मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, आता पोलिसांनी खबरदारी म्हणून 125 मराठा आंदोलकांना देखील नोटीसा बजावल्या आहेत.

बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची बीड (Beed) शहरात 23 डिसेंबर रोजी निर्णायक इशारा सभा होत असून, याच सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून 125 मराठा आंदोलकांना (Maratha Protestors) नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. सोबतच जाळपोळ आणि दगडफेकीत जामीन मिळालेल्या आंदोलकांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या सभेपूर्वी बीड पोलीस ॲक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे. 

23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार असून, याच सभेपूर्वी बीड पोलिसांनी 125 मराठा आंदोलकांना नोटीसा पाठवले आहेत.यामध्ये बीडमध्ये जी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती, याप्रकरणी जामीन मिळालेल्या आंदोलकांना देखील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन...

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, सभेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून 125 मराठा आंदोलकांना देखील नोटीसा बजावल्या आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना कायद्याने दिलेल्या अधिकाराप्रमाणेच आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था राखावी असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत. तर, वैयक्तिक किंवा शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेण्याचं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली सभास्थळाची पाहणी

23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार असून, बीड बायपास रोडवर या सभेचे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  याच सभास्थळाची पाहणी छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे. यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी सभेच्या ठिकाणी असलेल्या नियोजनाची आयोजकांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, काही सूचना देखील दिल्या. यासोबतच सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईची देखील त्यांच्याकडून माहिती घेण्यात येण्याची शक्यता आहे. 

आयोजकांना दिल्या 'या' सूचना... 

सभेला येणारे मराठा बांधव आणि इतर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर धुळे-सोलापुर या महामार्गाच्या बाजूलाच ही सभा होणार असल्याने, महामार्गावरची वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. मात्र, महत्त्वाच्या वाहनांना या मार्गावरून जाता येणार आहे. त्यामुळे, त्यांना देखील काही त्रास होणार नाही अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभेच्या आयोजकांना दिलाय आहेत. तसेच, सभेसाठी बीडसह बाहेर जिल्ह्यातील पोलीस देखील बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहेत. तर, सभेदरम्यान उपद्रवी लोकांवर पोलिसांची नजर असल्याची माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange Sabha : बीडमध्ये मनोज जरांगेंची इशारा सभा, वाहतुकीच्या मार्गामध्ये मोठे बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Embed widget