एक्स्प्लोर

Beed Dyanradha Multistate Suresh Kute Shop Clothes Worth Lakhs Stolen Theft Ongoing for Over a Month

Beed crime: यापूर्वीही सुरेश कुटेच्या मालमत्तेमधून अनेक वस्तू चोरीला गेल्याचे उघड झालं होतं.

Beed:ठेवीदारांचे कोट्यवधी बुडवणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश  कुटे सध्या कारागृहात आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेटसह अनेक व्यवसाय असणारा सुरेश कुटे जेलमध्ये असल्याचे पाहून त्याच्या बंद दुकानातून परिसरातील लोकांनी   लाखो रुपयांचे कपडे लंपास केल्याची घटना समोर आली आहे. बीड शहरातील पेठबीड भागात गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. या प्रकरणी बीड पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून पंचनामा करण्यात येत आहे. यापूर्वीही कुटेच्या मालमत्तांमधून अनेक साहित्य वस्तू, चोरीला गेल्याचं उघड झालं होत. या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सुरेश कुटे यांचे दुकान दीड महिन्यांपासून बंद आहे. सुरेश कुटे यांच्यावर ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, ७ जून २०२४ रोजी माजलगाव पोलिसांनी त्यांना आणि आशिष पाटोदेकर यांना अटक केली होती. तेव्हापासून कुटे हे तुरुंगात आहेत. दुकान बंद असल्याने त्याच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपड्यांची चोरून विक्री सुरू केली. या प्रकारामुळे लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

दुकानात सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच पेठबीड पोलिसांनी कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले. दुकानाची पाहणी केली असता अनेक कपड्यांचा साठा गायब असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यानंतर सुरेश कुटे यांच्या मालमत्तांवर गुन्हे दाखल झाले. याआधीही त्यांच्या इतर दुकानांमधून व घरातील साहित्य चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले होते. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि वस्तू गायब झाल्याची नोंद आहे.ज्ञानराधा मल्टीस्टेट आर्थिक घोटाळा प्रकरणात लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

ज्ञानराधा मल्टिस्टेटवर 42 हून अधिक गुन्हे

 

मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Beed: हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी करपलं ! पंचनाम्यासाठी फोन करूनही अधिकारी फिरकेनात; बीडमध्ये शेतकरी हवालदिल
हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी करपलं ! पंचनाम्यासाठी फोन करूनही अधिकारी फिरकेनात; बीडमध्ये शेतकरी हवालदिल
Pankaja Munde: केंद्राचे निकष बाजूला सारत दुष्काळ जाहीर केला,आता शेतकऱ्याची दिवाळीही गोड करू; पंकजा मुंडेंचा शब्द
केंद्राचे निकष बाजूला सारत दुष्काळ जाहीर केला,आता शेतकऱ्याची दिवाळीही गोड करू; पंकजा मुंडेंचा शब्द
दिवंगत खा. केशर काकू यांच्या पुण्यतिथीवरून बीडमध्ये राजकीय वाद उफाळला, 'एका' व्यक्तीला दिलेल्या निमंत्रणामुळे नातू संदीप क्षीरसागरांचा मोठा निर्णय
दिवंगत खा. केशर काकू यांच्या पुण्यतिथीवरून बीडमध्ये राजकीय वाद उफाळला, 'एका' व्यक्तीला दिलेल्या निमंत्रणामुळे नातू संदीप क्षीरसागरांचा मोठा निर्णय
Beed News: दुष्काळ, मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होईना, दुध वाटून वडील घरी आले नाहीत समजताच मुलगी शेतात गेली अन्..; बीड हादरलं!
दुष्काळ, मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होईना, दुध वाटून वडील घरी आले नाहीत समजताच मुलगी शेतात गेली अन्..; बीड हादरलं!

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
Embed widget