मराठा आरक्षण! बीड जिल्ह्यात 68 टक्के सर्वेक्षण पूर्ण; आता उरला उद्याचा शेवटचा दिवस
Beed : या सर्वेक्षणासाठी 182 प्रश्नाची प्रश्नावली असून, काही प्रश्न किचकट असल्याचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाकडून (State Backward Classes Commission) मराठा आणि खुल्या प्रवर्गाचा सर्वेक्षण केला जात आहे. यासाठी 23 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून, 31 जानेवारीला हे सर्वेक्षण संपणार आहे. मागील सहा दिवसांत मराठवाड्यात सर्वेक्षणाचे काम मोठ्या वेगाने सुरु आहे. दरम्यान, अशीच काही परिस्थिती बीड (Beed) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 68 टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहेत.
मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला वेग आला असून, उद्या या सर्वेक्षणाची अंतिम तारीख आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 68 टक्के मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 23 जानेवारीपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. बीड जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण करता आलं नव्हतं. मात्र, आता या सर्वेक्षणाला वेग आला असून, सर्वेक्षण करणारे कर्मचारी दारोदारी जाऊन खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणासाठी 182 प्रश्नाची प्रश्नावली असून, काही प्रश्न किचकट असल्याचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सर्वेक्षणाच्या कामाला वेग
सर्वेक्षणाची उद्या शेवटची तारीख असून, मराठा आणि खुल्या प्रवर्गातून देखील मोठ्या प्रमाणात या सर्वेक्षणाला प्रतिसाद मिळत आहे. मागासवर्गीय आयोगाकडून हे सर्वेक्षण केले जात असून, मराठा आणि खुल्या प्रवर्गातील प्रत्येक नागरिकाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहे. उद्या या सर्वेक्षणाची शेवटची तारीख असल्याने अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामाला वेग दिला आहे.
सर्वेक्षणासाठी चक्क खाजगी व्यक्तींची नियुक्ती
एकीकडे बीड जिल्ह्यात सर्वेक्षण वेगाने सुरु असतानाच दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षणाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने आपल्याजागी चक्क खाजगी व्यक्तींची नियुक्ती करून सर्वेक्षण करून घेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाचा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या संबंधीत कर्मचारी याने देखील आपल्याजागी खाजगी व्यक्तींना सर्वेक्षणासाठी पाठवल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता हे सर्वेक्षण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरात चक्क पहिली पास कर्मचारी यांच्यावर सर्वेक्षणाची जबादारी देण्यात आली होती. त्यामुळे हे सर्वेक्षण पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
सावळा गोंधळ! पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचा सर्वेक्षण; मराठा समाजात तीव्र संताप