Beed News: इकडे मुंबईत मराठा आंदोलन तापलं, तिकडे बीडमध्ये सर्वपक्षीयांकडून जिल्हा बंदची हाक, हालचालींना वेग
Beed News: उद्याचा बीड जिल्हा बंद शांततेच्या मार्गाने असेल असं देखील आवाहन यादरम्यान करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवत उद्याचा बीड जिल्हा बंद असणार आहे.

बीड : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. न्याय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला वेगळ्या मार्गाने अडचणी आणणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय संघटनेकडून जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबतचे आवाहन समाज माध्यमावर करण्यात आलेल्या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. उद्याचा बीड जिल्हा बंद शांततेच्या मार्गाने असेल असं देखील आवाहन यादरम्यान करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवत उद्याचा बीड जिल्हा बंद असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
कोर्टाच्या आजच्या सकाळच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे
1) तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश
2) सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट
३) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही
४) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत
५) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार
मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली?
1) आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही
२) ५ हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली पण ५०० लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही
३) मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली
४) आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय
कोर्टाचे सरकारला आदेश काय?
1) दुपारी तीनपर्यंत सगळं सुरळीत करा, दक्षिण मुंबई रिकामी करा
2) अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा
3) कोर्टाचा अवमान केल्यास कारवाई करु
4) स्थानिकांना शांततेत राहू द्या, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते घराबाहेर पडू शकत नाहीत
























