(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"भुजबळांचा पडद्यामागून मराठा आरक्षणाला विरोध, पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या", मनोज जरांगेंनी पुन्हा डिवचलं
Manoj Jarange : मराठा समाजाला यापूर्वीही आरक्षण मिळालं. मात्र, छगन भुजबळ यांनी पडद्यामागून पैसे देऊन आरक्षणाला विरोध करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावल्या, असे मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Patil बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गेवराई तालुक्यातल्या गंगावाडी येथे मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी धनगर आणि नाभिक समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला. गंगावाडी येथे झालेल्या सभेमध्ये जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा चांगला समाचार घेतला. तर मराठा समाजाच्या नावावर पैसे खाणाऱ्या लोकांचे देखील चांगलेच काम टोचले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला यापूर्वी देखील आरक्षण (Maratha Reservation) मिळालं. मात्र, छगन भुजबळ यांनी पडद्यामागून पैसे देऊन आरक्षणाला विरोध करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ज्या ज्या समित्यांनी आतापर्यंत काम केलं. त्या समितींचा अहवाल खोटा ठरवण्यासाठी छगन भुजबळ यांनी सातत्याने प्रयत्न केला, असं म्हणत 'येवल्याचे येडपट' असा उल्लेख देखील यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
75 वर्षांमध्ये जे मिळालं नाही ते मुंबईत जाऊन आपण मिळवलं
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याचे ठरवलं होतं. मात्र, उपोषण करण्यापूर्वीच सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. मात्र, यावर अनेकांनी टीका केली आणि मनोज जरंगे पाटील यांना मुंबईत जाऊन काय मिळालं? असा प्रश्न उपस्थित केला होता यावर बोलताना मनोज जरंगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या नावावर जे लोक पैसे खातात. त्यांना असं वाटतं की, मुंबईत जाऊन समाजाला काय मिळालं. पण 75 वर्षांमध्ये मराठा समाजाला जे मिळालं नाही ते मुंबईत जाऊन आपण मिळवलं, असं प्रत्युत्तर म्हणून जरांगे पाटील यांनी टीका करणाऱ्यांना दिले आहे. आरक्षणासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली असून लवकरच कायदा करण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांचे उद्यापासून पुन्हा उपोषण
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपल्याला शांततेत आंदोलन करायचे आहे. आतापर्यंत आपण जे आंदोलन केलं त्यामुळे 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून दीड कोटी मराठे आरक्षणात गेले आहेत. सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यावर आता लवकर कायदा करावा आणि सगळे सोयरे यांच्या देखील प्रमाणपत्राचे वाटप व्हावं यासाठी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा म्हणून मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत.
आणखी वाचा