एक्स्प्लोर

Rashmi Shukla : जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झालाय पण...., पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं जनतेला खुलं पत्र 

Rashmi Shukla letter : राजाच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला एक पत्र लिहिलं आहे.

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla letter) यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलं आहे. जनतेचा पोलीस दलावरील (Maharashtra Police) विश्वास कमी झाल्याची कबुली स्वतः पोलीस महासंचालकांनी पत्राद्वारे दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं हे पत्र चर्चेत आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी आहे, असं रश्मी शुक्ला यांनी पत्रात म्हटलं आहे. 

रश्मी शुक्ला यांच्या पत्रात नेमकं काय?

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलिस दारावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील.

पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. . राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात.  रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.  महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक, आहेत.  सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. 

ही बातमी वाचा : 

Bharat Ratna: राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या : राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing Ajit Pawar : कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका - अजित पवारVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 28 एप्रिल 2024ABP Majha Headlines : 6 PM  : 28 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Shivtare On Baramati Loksabha : संपूर्ण ताकदीने सुनेत्रा वहिनीचे काम करतोय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
Embed widget