(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मोदीही मला संपवू शकत' नसल्याच्या वक्तव्यावर अखेर पंकजा मुंडेंचा खुलासा, ट्वीट करत...
Beed News: मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केलेला नसल्याचा पंकजा मुंडे यांच्याकडून खुलासा.
Beed News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याची काळापासून जोरदार चर्चा सुरू असून, 'मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) देखील हरवू शकत नाहीत' असं त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यासर्व प्रकरणावर आता खुद्द पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असुन, यात मोदीजींबद्दल कुठलेही नकारात्मक उल्लेख केला नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
यावर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, मी आपल्या भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने ऊपस्थित बालकांच्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची गरज सांगत असताना मोदीजींचा उल्लेख केला होता. त्यामुळे मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असुन, यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केलेला नाही. पंतप्रधान मोदीजींचा उल्लेख सर्वश्रेष्ठ रणधुरंधर राजकीय नेतृत्व या पद्धतीने केलेला आहे. तर “चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत" असा सकारात्मक संदर्भ यामागे असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडेंकडून ट्वीट...
तर याबाबत पंकजा मुंडे यांनी एक ट्वीट केला असून ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17 sep पासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे. "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या link वर आहेच... ”
मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17sepपासून विविध कार्यक्रम केले,त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights.आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे,"सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पहा,मतितार्थ लक्षात येईल.पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या linkवर आहेच.धन्यवाद.https://t.co/vvgRC0poti
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 27, 2022
महत्वाच्या बातम्या...
मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला संपवू शकणार नाहीत; पंकजा मुंडेंचं वक्तव्य
Dasra Melava: शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर आता भगवान गडाचा दसरा मेळवा 'वादा'त