Beed News : काय सांगता! गावातील चहाच्या टपरीसाठी तब्बल 30 लाखाची बोली; गावकऱ्यांनी तोंडात बोट घातले
Beed News : एका गाळ्यासाठी 11 महिन्यांचे भाडे म्हणून चहाच्या टपरीवाल्याने चक्क 30 लाखांची बोली लावत गाळा मिळवला.
Beed News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कधीकाळी रेल्वे स्थानकावर चहा विकल्याची मोठी चर्चा नेहमीच होते. मात्र अशीच काही चर्चा आता बीडच्या (Beed) अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावातील एका चहावाल्याची आहे. कारण अवघ्या साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गावात एका चहाच्या टपरीसाठी तब्बल 30 लाखांची बोली लागली आहे. ग्रामपंचायतने बांधलेल्या चार व्यापारी गाळ्यांचा लिलाव झाला आणि याचवेळी एका गाळ्यासाठी 11 महिन्यांचे भाडे म्हणून चहाच्या टपरीवाल्याने चक्क 30 लाखांची बोली लावत गाळा मिळवला.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा हे छोटंस गाव आहे. दरम्यान गावाच्या ग्रामपंचायतचं उत्पन्न देखील काही खूप मोठं नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संबंधित ग्रामपंचायतने 10 बाय 10 आकाराचे चार गाळे बांधले होते. यातून काहीतरी आर्थिक उत्पन्न होईल म्हणून, ग्रामपंचायतने बांधलेले गाळे 11 महिन्याच्या करारावर भाड्याने देण्याच ठरवलं. यासाठी सोमवारी बोली लागली. तर या बोलीत चहाची टपरी, झेरॉक्स, सलून दुकानदारांनी सहभाग घेतला. पण यातील एक गाळ्याची बोली 30 लाखापर्यंत गेली. विशेष 30 लाखांची बोली लावणारा व्यक्ती हा एक चहा वाला होता. तर गावातील चहाच्या टपरीसाठी तब्बल 30 लाखाची बोली लागल्याने गावकऱ्यांनी तोंडात बोट घातले.
दुसऱ्या नंबरची बोली 25 लाखांची...
डोंगरपिंपळा येथील ग्रामपंचायतचा उत्पन्न वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने चार गाळे बांधले. दरम्यान यासाठी अधिकृतरीत्या लिलाव आयोजित करण्यात आला. या लिलावात सहभाग घेण्यासाठी पाच हजारांची अनामत रक्कम घेण्यात आली. जवळपास दहा लोकं यात सहभागी झाले. सोमवारी लिलाव ठेवण्यात आला. लिलावात पुढे बोली सुरु झाली आणि वाढत गेली. पाहता-पाहता एकमेकांचे आकडेही वाढू लागले. दरम्यान या चार गाळ्याच्या लिलावात एका गाळ्याची किंमत चक्क लाखात गेली. पाहता-पाहता हा आकडा 20 लाखाच्या पुढे गेली. दरम्यान यावेळी एकाने चक्क 25 लाखाची बोली लावली. पण याचवेळी गावात चहाचं दुकान असलेल्या एका व्यक्तीने त्यापुढे जात थेट 30 लाखांची बोली लावली. त्याच्या 30 लाखाच्या बोलीच्यापुढे आणखी रक्कम वाढवण्याची इतर कोणाची हिम्मत झाली नाही, आणि शेवटी तीस लाखात गाळ्याचा लिलाव झाला. पण या लिलावा पेक्षा चहाच्या टपरीसाठी तीस लाखांची बोली लावल्याचीच परिसरात अधिक चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed : बीडच्या आष्टी तालुक्यात एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला गारपीटीचा फटका