काय सांगता! उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन ठोकली धूम; बीड जिल्ह्यातील घटना
Beed Crime News: याप्रकरणी भोंदूबाबाविरुद्ध युसूफवाडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
Beed Crime News: बीड जिल्ह्याच्या (Beed District) केज तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन धूम ठाकली आहे. एका व्यक्तीवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्याच्या बहाण्याने या भोंदूबाबाने त्याच कुटुंबातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी आपले सूत जुळवून तिला घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर याप्रकरणी भोंदूबाबाविरुद्ध युसूफवाडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. धोंडीराम भोसले महाराज ऊर्फ माऊली (रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असे या बाबाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खेडेगावातील एका इसमावर रुग्णालयात उपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांच्या सांगण्यावरून धोंडीराम भोसले महाराज ऊर्फ माऊली (रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) या महाराजांशी संपर्क साधला. दरम्यान, या बाबाने आपण आयुर्वेदिक पद्धतीने यावर उपचार करून तुमचा आजार लवकरच बरे करतो, असे आश्वासन देऊन उपचार सुरू केले होते. नित्यनेमाने दररोज हा भोंदूबाबा या इसमावर उपचार करण्यासाठी चारचाकी वाहनातून यायचा. तब्बल एक वर्ष उपचार केल्यानंतर बुधवारी हा बाबा उपचार करण्यासाठी घरी आला आणि या कुटुंबातील घरामागील हातपंपावरून पाणी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला घेऊन त्याने धूम ठोकली.
भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल...
मुलीला घेऊन बाबा फरार झाला तर इकडे मुलगी घरी परत कशी आली नाही? म्हणून आईसह नातेवाइकांनी शोध सुरु केला. परिसरातील नातेवाईकांकडे विचारपूस केली. परंतु मुलगी काही घरी आलीच नाही. शेवटी मुलीच्या आईने शुक्रवारी युसूफवाडगाव पोलिसांत धोंडीराम महाराज भोसले ऊर्फ माऊली या भोंदूबाबानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यावरून भोंदूबाबाविरुद्ध केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापूराव काळे हे करीत आहेत.
कुटुंबातील सर्वांचा विश्वास संपादन केला.
आजारी व्यक्तीला आपण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून बरे करण्याचा दावा या भोंदूबाबाने दिला. त्यामुळे त्याच्यावर कुटुंबातील सदस्यांनी देखील विश्वास ठेवला. तब्बल वर्षभरापासून हा बाबा उपचार करत होता. त्यामुळे नित्यनेमाने दररोज हा भोंदूबाबा उपचार करण्यासाठी चारचाकी वाहनातून यायचा. या काळात त्याने कुटुंबातील सर्वांचा विश्वास संपादन केला. मात्र त्याच्या मनात मात्र दुसरंच काही सुरु होता. दरम्यान बुधवारी हा बाबा उपचार करण्यासाठी घरी आला आणि या कुटुंबातील घरामागील हातपंपावरून पाणी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला घेऊन त्याने धूम फरार झाला. अनेक ठिकाणी शोधून देखील मुलगी सापडत नसल्याने अखेर कुटुंबाती सदस्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.
इतर महत्वाच्या बातम्या: