एक्स्प्लोर

Beed Grampanchayat Election: बीड: ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर; वडवणीत 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Beed Grampanchayat Election: बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक जबाबदारीत कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed News: आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे (Maharashtra Grampanchayat Election 2022) मतदान सुरू झाले आहे. राज्यात मतदानाचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) वडवणी तालुक्याचे (Wadavani) तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदान सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात  आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविंद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे, शाहूराव पांडुरंग जायभाये, दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही. एस. डाके या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रामस्थांचा तहसील कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी ठिय्या

बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडे वस्ती येथील मतदान बूथ प्रत्येक वेळी मेंगडेवाडीच येथेच असते. मात्र यावेळी प्रशासनाने अचानक तेथील बूथ चऱ्हाटा येथे हलविल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. रात्री उशिरा ग्रामस्थांनी बीड तहसिलसमोर ठाण मांडले होते. मेंगडेवाडी येथेच बूथ ठेवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. 

670 ग्रामपंचायतीसाठी मतदान

बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे.  670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर  ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत.  जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात करण्यात आले आहेत. तर, संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची अधिक कुमक आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget