मोठी बातमी : महाविकास आघाडीतील बीड लोकसभेचा उमेदवार ठरला?; उद्याच शरद पवार गटात प्रवेश
Beed Lok Sabha Candidate : पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरु आहे. अशात शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित झाला असल्याची माहिती मिळत आहे.
Maha Vikas Aghadi Beed Lok Sabha Candidate : बीड लोकसभा मतदारसंघाबाबत (Beed Lok Sabha Constituency) मोठी बातमी समोर येत असून, बीडमधील महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असल्याची माहिती मिळत आहे. बजरंग बप्पा सोनवणे (Bajrang Bappa Sonwane) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर बीड (Beed) लोकसभा लढण्याची शक्यता आहे. उद्या पुण्यात शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत बजरंग बप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी होते म्हणून सोनवणे यांची ओळख आहे. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे असच सामना बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. अशात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या देखील नावाची चर्चा होती. मात्र, महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सोनवणे यांच्याच नावाचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. तर, उद्या बजरंग सोनवणे शरद पवारांच्या उपस्थितीत पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मागील निवडणुकीचा निकाल काय सांगतो?
- प्रीतम मुंडे 6 लाख 78 हजार 175 मते
- बजरंग सोनवणे 5 लाख 9 हजार 108 मते
ज्योती मेटे यांच्या नावाची देखील चर्चा
बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र, कालपासून ज्योती मेटे यांच्या देखील नावाची चर्चा पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे, विधान परिषदेच्या निवडणुकीत विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल मेटे समर्थकांच्या मनात आजही पाहायला मिळते. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आले आहे. तर, ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. अशात आता सोनवणे यांचे नाव समोर येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :