एक्स्प्लोर

Laxman Hake : बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर दगडफेक, आमदार विजयसिंह पंडित- लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते भिडले

Laxman Hake : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

Laxman Hake Car Attacked बीड: गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मात्र, लक्ष्मण हाकें यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.

गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं काल दहन करण्यात आलं होतं. त्याच चौकात लक्ष्मण हाके आलेले आहेत. याच ठिकाणी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील जमले आहेत. चप्पल भिरकावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचं दिसून आलं. लक्ष्मण हाकेंच्या गाडीची पुढील काच फुटल्याचं पाहायला मिळालं. गेवराईतील शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरु आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई बॅनर लावण्यात आले होते. त्या वरून हा गोंधळ आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेला जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांना आव्हान दिलं होतं.  विजयसिंह पंडित यांचे मनोज जरांगे यांना समर्थन देणारे बॅनर लागले होते. त्यावरुन वाद झाला होता. लक्ष्मण हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. या वादात चप्पल भिरकवण्यात आली, दगडफेक करण्यात आली, दंडुक्याची भाषा वापरण्यात आली. यानंतर या ठिकाणावरील परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन लक्ष्मण हाके यांना बाहेर काढून बीडच्या दिशेनं रवाना केलं. या राड्यात लक्ष्मण हाकेंना देखील मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते या चौकात दोन्ही बाजूला थांबलेले दिसून येत आहेत. या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. गेवराई शहरात दोन्ही गट आक्रमक झालेले होते.

विजयसिंह पंडित काय म्हणाले? 

लक्ष्मण हाके हे समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं कुटील कारस्थान बीड जिल्ह्यात येऊन सुरु आहे.  तीन चार दिवसांपूर्वी खालच्या पातळीवर जाऊन माझ्या विरोधात प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. चिथावणीखोर वक्तव्यांना आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे, असं विजयसिंह पंडित म्हणाले. जरांगेनंना समर्थन दिल्यानं समाजासमाजात तेढ निर्माण होण्याचा काय प्रश्न असं विजयसिंह पंडित म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी मिळणार; राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची माहिती
मोठी बातमी! मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी मिळणार; राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची माहिती
Samrudhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावरील लूट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; फिल्मी स्टाईल सापळा रचून 7 आरोपींना ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या पोहचली 11वर
समृद्धी महामार्गावरील लूट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; फिल्मी स्टाईल सापळा रचून 7 आरोपींना ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या पोहचली 11वर
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
Embed widget