एक्स्प्लोर

Beed News : बीड जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळाच्या तपासण्या होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Beed News : बीड जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळाच्या तपासण्या करण्याचे आदेश जिल्दिहाधिकारी यांनी दिले आहेत. 

Beed News : गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात (Beed District) खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा (पॅथॉलॉजिकल लॅब्स) मध्ये रुग्णांचे रक्त नमुने व तपासणी करण्याची नियमानुसार पद्धती अवलंबली जात नसल्याचे समोर आले आहे. सोबतच जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या देखील वाढत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी यात लक्ष घातले आहे. तसेच बीड जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळाच्या तपासण्या करण्याचे आदेशही दिले आहेत. 

खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा (पॅथॉलॉजिकल लॅब्स) मध्ये रुग्णांचे रक्त नमुने व तपासणी करण्याची नियमानुसार पद्धती अवलंबली जात नाही. तसेच प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा काही पॅथॉलॉजिकल लॅब्स मध्ये उपस्थित नसल्याचे नमूद करण्यात आल्याने बीड येथील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नियमानुसार तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहे. तसेच यावेळी बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या तालुकास्तरीय समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्यास सादर केला जावा आणि जिल्हास्तरीय समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यानंतर घेण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी केल्या आहे. 

बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश 

बोगस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आले असून, त्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी तसेच तहसील व पोलीस विभागाचे प्रतिनिधी आहेत. बोगस डॉक्टर बाबतच्या 62 केसेस जिल्ह्यात दाखल असून, यापैकी 32 न्यायप्रविष्ठ आहेत. सन 2019-20 या वर्षात तीन प्रकरणे दाखल झाली होती. 20 -21 या वर्षात एक व 21-22 या वर्षात दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र असे असताना अजूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर आहे. त्यामुळे आता प्रशासनाने अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरु केली आहे. 

बैठकीत यांची उपस्थिती... 

बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे बोलत होत्या. बैठकीस पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक (गृह) पी एन शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी  कार्यालयाचे डॉ पी के पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे विधी सल्लागार अॅड. जोशी, अशासकीय सदस्य आर टी गर्जे, शेख सिराज हे उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed News: गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना 1 मे पासून जीपीएस बंधनकारक, अन्यथा कठोर कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget