एक्स्प्लोर

Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर

येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Gold Silver Rates: गेल्या काही दिवसांपासून भारतातील सोन्या चांदीच्या दारात (Gold Silver Rates) सातत्याने चढउतार दिसून येत आहेत. आठवड्याभरापूर्वी चढे असणारे सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करत असाल तर सराफा बाजारात तुमच्या शहरातल्या किमती आणि ताजे दर जाणून घ्या.आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी,डॉलरचा वाढता दर, रुपयाची घसरण अशा अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीच्या दरामध्ये देशांतर्गत बाजारातही बदल घडत असतात. 

सोन्या चांदीचे दर घसरले

19 जुलै 2026 रोजी सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत किंचित घट नोंदवली गेली आहे. देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर  1 लाख 41 हजार 610 रुपयांवर स्थिरावला आहे.काल हा दर एक लाख 42 हजार 680 रुपये होता. कालच्यापेक्षा आज साधारण 1000 रुपयांची घसरण सोन्याच्या दरात नोंदवली गेली आहे. तर चांदीचा दर किलोमागे 2 लाख 16 हजार 860 रुपयांवर पोहोचला आहे. शनिवारी ( 18 जुलै ) चांदीचा दर 2 लाख 35 हजार रुपये होता. त्यामुळे कालचा तुलनेत चांदीच्या दरात जवळपास 18 हजारांची घसरण झाली आहे.

कोणत्या शहरात किती दर ?

मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर,  नाशिक, नागपूर या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम मागेदर एक लाख 41 हजार 360 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 29 हजार 580 रुपयांवर असून 18 कॅरेटचा दर 1 लाख 06 हजार 20 रुपये झालाय. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 41 हजार 110 रुपये आहे.22 कॅरेट सोनं एक लाख 29 हजार 351 रुपयांवर पोहोचलंय.

सोन्या-चांदीच्या किमती घसरण्याचं कारण काय?

बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती.अमेरिका इराणच्या शांतता कराराच्या मावळत्या आशांमुळे महागाईची चिंता वाढली आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर चढाच  राहण्याच्या अपेक्षांना बळकटी मिळाली.परिणामी सोन्याचांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली.या घसरणीनंतर सोन्या चांदीच्या घसरणीचा हा ट्रेंड कायम आहे.

सोन्या चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम असून महिन्याभरापूर्वी एक लाख 47 हजार 530 रुपयांवर असलेलं सोनं आठवड्याभरापूर्वी  एक लाखाचा 44 हजार रुपये होता. या आठवड्याच्या शेवटी 1 लाख 41 हजार 610 रुपयांवर फादर पोहोचलाय.चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर,महिनाभरापूर्वी दोन लाख 33 हजार 820 रुपयांवर असलेली चांदी आठवड्या भरापूर्वी दोन लाख 23 हजार रुपयांवर पोहोचली.या आठवड्यात दोन लाख 16 हजार 860 रुपयांवर चांदीची किंमत स्थिरावली आहे.

आज सोने-चांदी खरेदी करावी का?

जर तुम्ही लग्नसराई, सण-उत्सव किंवा वैयक्तिक वापरासाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम आपल्या शहरातील ताजे दर तपासणे आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरचा दर, व्याजदर आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget