एक्स्प्लोर

Agriculture News : दुसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील कापूस आणि तुरीचेही सर्वेक्षण होणार, शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा

पहिल्या टप्प्यात सोयाबीन मूग आणि उडीद पिकाचा सर्वेक्षण केलं जाणार आहे. या तिन्ही पिकांचा एकत्रित सर्व्हे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कापूस तुरीचेही सर्वेक्षण होणार आहे.

Agriculture News : बीड (Beed) जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच शेतकऱ्यांना (Farmers) मदत म्हणून सरकारनं अग्रीम पीक विम्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाचा सर्वेक्षण केलं जाणार आहे. या तिन्ही पिकांचा एकत्रित सर्व्हे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कापूस तुरीचेही सर्वेक्षण होणार असून शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळणार आहे.

बीड  जिल्हा प्रशासनाने कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा (Pik Vima) मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पीकविमा कंपनीनं तातडीनं अग्रीम पीकविमा वितरीत करण्याचे निर्देशही  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे. पहिल्या चार दिवसात प्राप्त सर्व्हे अहवालानुसार सोयाबीनच्या 52, मुगाच्या 22 तर उडीदाच्या 13 मंडळांमध्ये अग्रीम विमा मंजूर करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळसदृश परिस्थिती

बीड जिल्ह्यातील विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळं शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आत महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करुन अहवाल सादर करावा असे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी 87 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन, उडीद आणि  मूग या पिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळं संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा अधिक असल्यास निकषानुसार ही महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र ठरतात. त्या महसूल मंडळांमध्ये तातडीने अग्रीम पीक विमा देण्यात येतो, अशा पद्धतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.  

50 टक्केच्या निकषात बसणारी सर्व मंडळे पिक विम्यास पात्र

दरम्यान, उर्वरित मंडळांचे सर्व्हेक्षण अजूनही सुरु आहे. येत्या चार ते पाच दिवसात सोयाबीनचे सर्व 87 मंडळातील सर्व्हे पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानुसार 50 टक्केच्या निकषात बसणारी सर्व मंडळे सोयाबीन अग्रीम पिकवीम्यास पात्र ठरणार आहेत. तसेच सोयाबीनचे सर्व्हेक्षण अहवाल सादर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर या दोन पिकांचे सर्व्हे हाती घेण्यात येणार आहेत. ते सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर 50 टक्के नुकसानीच्या निकषानुसार त्या पिकांनाही अग्रीम पिकविमा लागू होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको 

तेलगाव महसूल मंडळामध्ये पावसाचे प्रमाण कमी पासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे तरीदेखील शासनाने जाहीर केलेल्या अग्रीम पीक विम्यातून या महसूल मंडळातील 13 गाव वगळण्यात आले आहेत. त्यामुळं तेलगाव महसूल मंडळाला सरसकट आगरीम पीक विमा जाहीर करण्यात यावा यासाठी या शेतकऱ्यांनी हे रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामध्ये अनेक गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळं परळीहून बीडकडे जाणारी वाहतूक आणि माजलगावहून धारुरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture news : बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget