एक्स्प्लोर

Dhananjay Munde: एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा निर्णय; राधाकृष्ण विखे-पाटलांचं सूचक वक्तव्य

Beed Crime: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप होत असल्याने धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.

सोलापूर: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. सीआयडी आणि विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणातील आरोपी आणि संबंधितांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, या सगळ्यात वाल्मिक कराड यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. गेली अनेक वर्षे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही, असे बोलले जाते. मात्र, याच 'राईट हँड'मुळे आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत.   यावरूनच आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतरच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं विखे पाटील म्हणालेत. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत का? याची चर्चा सुरू झाली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना याविषयी भाष्य केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले. दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा आहे. मंत्री मंडळात खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. मी सुद्धा मिळालेल्या विभागावर नाराज नाहीय. मी  आता माझ्या वडिलांची दुष्काळ हटवायण्याची  इच्छा पूर्ण करू शकेन, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.

बीडमध्ये एसआयटीच्या तपासाला वेग

संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी तपासाची सूत्रे हाती घेतली होती.  बसवराज तेली हे बीडमध्येच मुक्कामी आहेत. काल बसवराज तेली यांनी केज शहरात जाऊन सीआयडीच्या अधिकाऱ्याकडून संतोष देशमुख प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर रात्री आठ वाजता बीड शहरातील शहर पोलीस स्टेशन मधील सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मीक कराड याची चौकशी केली. आज दुसऱ्या दिवशी पुन्हा बसवराज तेली हे संतोष देशमुख प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.

आणखी वाचा

वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रारPune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Embed widget