Dhananjay Munde VIDEO : कृषिमंत्री नर्तकीला नाचवतोय म्हणून शिव्या देताय, पण तुमच्या पोटात का दुखतंय? परळीत धनंजय मुंडेंनी भाषण गाजवलं
Dhananjay Munde Nath Pratisthan : निवडणुका जवळ आल्यामुळे नाथ प्रतिष्ठानचा कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे असा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
बीड : नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात कृषिमंत्री नर्तकीला नाचवतोय म्हणून माझ्यावर टीका केली जातेय, पण यांच्या पोटात का दुखतंय असा सवाल धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विरोधकांना केला. नाथ प्रतिष्ठानने 19 वर्षात अनेक महत्त्वाची कामं केली आहेत असंही त्यांनी सांगितलं. नातं प्रतिष्ठांच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना उपस्थित होती.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
ज्यांचं ज्यांचं नाथ प्रतिष्ठान मध्ये योगदान आहे त्या सगळ्यांचे 19 व्या वर्षी आभार मानतो. आपण या सगळ्या अभिनेत्रींना बोलावलं. चार दिवसांपूर्वी मोठा पाऊस या ठिकाणी झाला. अगोदरच मी कृषिमंत्री. त्यामुळे कृषिमंत्री म्हटल्यानंतर पाऊस जास्त झाला तरी शिव्या खाव्या लागतात. पाऊस कमी झाला तरी उचक्या कृषिमंत्रालाच लागतात. आणि अतिवृष्टी झाल्यानंतर उचकीही लागते आणि पोटहा दुखतं.
नाथ प्रतिष्ठानवर टीका करणाऱ्याना उत्तर द्यायचं आहे. शेतकऱ्यांच्या 2,200 मुलीचं कन्यादान याच नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला करता आलं. पावसामुळे अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला किराणा घरपोच करण्याचं काम याच नाथप्रतिष्ठांनने केलं. कोरोनाच्या काळात ज्यांना त्रास झाला त्यांना रेमडीसेव्हर द्यायचं काम याच नाथप्रतिष्ठानने केलं.
या नाथप्रतिष्ठानवर पहिली टीका केली जाते. या कृषिमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हणून इथं नर्तिकांना नाचवलं जातंय अशी टीका केली जाते. पण तुमच्या पोटात का दुखतंय? युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट येत आहे आणि त्या चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांच्या सून म्हणून रश्मिका काम करणार आहेत. धनंजय मुंडे वाईट असेल तर त्याला शिवी द्यायचा तुम्हाला अधिकार आहे. पण कलाकाराला नाव ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. हो, हा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी होणार. काही नैसर्गिक संकट आले तर होणार नाही. या वैजनाथ गणेशोत्सवासारखा उत्सव देशात कुठेही होत नाही म्हणून या लोकांच्या पोटात दुखायला लागलंय.
आता निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुका जवळ आल्या म्हणजे आता अनेकांच्या सुप्त इच्छा जागा झाल्या. निवडणुकीत हा कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे असा प्रयत्न केला जातोय. परळीतील पाण्यामुळे बाधित झालेल्या 1000 घरात त्यांच्या जेवणापासून रेशनपर्यंत जबाबदारी याच नाथ प्रतिष्ठान घेतली. बाधित कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये नाथ प्रतिष्ठानकडून दिले जाणार आहेत.
सध्या राज्यातला शेतकरी संकटात आहे. कृषिमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्यांना सरकारकडून मदत मिळणार आहे.
राजकारणात अनेक जणांना गुदगुल्या होत आहेत. सही वक्त पर करवा देंगे, हदो को एहसास. कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है.
मला अनेकांनी विचारलं की तुम्ही रश्मिका यांना का बोलवलं? मी 'ॲनिमल' चित्रपट बघितला नाही. मात्र चार्टर बघितला म्हणून चार्टर पाठवून आणलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट येत आहे आणि त्या चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांच्या सून म्हणून रश्मिका काम करणार आहेत.
ही बातमी वाचा: