Pankaja Munde : 'XYZ माणसाबद्दल...', एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
Ekanth khadse : भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, मात्र प्रमुख नेत्यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.
![Pankaja Munde : 'XYZ माणसाबद्दल...', एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? Pankaja Munde reaction on Eknath Khadse BJP joining statement Maharashtra Politics Marathi News Pankaja Munde : 'XYZ माणसाबद्दल...', एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/725fa0bf7668162611e1fb2ac2c952741725614329017923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नुकताच मोठा गौप्यस्फोट केला. भाजपमध्ये (BJP) जे पी नड्डा (J P Nadda) यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असे त्यांनी म्हटले. आता यावर भाजपच्या विधान परिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विचारले असता त्यांनी XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही, असे उत्तर दिले आहे.
आज राहाता (Rahata) येथील पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. पंकजा मुंडे यांच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना राहाता येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामास मंजुरी मिळाली होती. इमारतीच्या उद्घाटनानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही
एकनाथ खडसे यांच्याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, ते काय म्हणाले यावर मी काय बोलणार? अमूक कोणी म्हटले म्हणून मी त्यावर टिप्पणी करत नाही. मी भूमिकेवर राजकारण (Politics) करते. काय काम झालं पाहिजे हे मी बघते. XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
लाडकी बहीण योजना लोकांना खूप आवडलीय
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महायुतीत श्रेयवाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना ही खूप मोठी योजना आहे. लोकांना देखील ही योजना खूप आवडली आहे. आम्ही सगळे जरी कामाला लागलो तरी सर्वांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे आमच्यात कुठंही चढाओढ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केलं जाईल
महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन पक्ष वेग वेगळ्या पद्धतीचे राजकारण करत असतात. विरोधी पक्ष हार घालून सत्कार करतील, अशी अपेक्षा नसते. तोंडावर निवडणुका आल्या आहेत. प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केलं जाईल. मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
आणखी वाचा
एकनाथ खडसेंनी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, आता मुलीसाठी सोयीस्कर राजकारण; चंद्रकांत पाटलांचा टीकेचा बाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)