या लोकांना छगन भुजबळचा इतिहास माहीत नाही, शिवसेना सोडल्यानंतर असे अनेक आव्हान पचवलं : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात आवाहन करत सांगितले, “आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, हक्क अबाधित राहतील.”

Chhagan Bhujbal on Beed Rally: आरक्षण जातंय (OBC Reservation)( या भीतीने अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, माझं या सर्वांना आवाहन आहे अस करू नका. आरक्षणाला धक्का लागणार नाही या साठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या (OBC Elgar Melava Beed) पार्श्वभूमीवर केलं आहे. बीडमध्ये आज ओबीसींचा मेळावा होत असून हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) रद्दची मागणी मेळाव्यातून केली जाणार आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयकांना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ म्हणाले की, ज्या बीडमध्ये जरांगेच्या लोकांनी धुडगूस घातला, आमदारांची घरे जाळली, ओबीसी नेत्यांवर हल्ले केले, तिथं हा ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके उपस्थित राहणार आहेत.
या लोकांना छगन भुजबळ यांचा इतिहास माहीत नाही
छगन भुजबळ म्हणाले की, या लोकांना छगन भुजबळ यांचा इतिहास माहीत नाही. शिवसेना सोडल्यानंतर असे अनेक आव्हान पचवले आहे. जेव्हा हे सगळे लहान होते तेव्हा मी हे बघितलं आहे. दरम्यान, हा मेळावा अजित पवार पुरस्कृत असल्याची चर्चेवर ते म्हणाले की, हा कोणत्याही पक्षाचा मेळावा नाही. मात्र, सर्वपक्षीय नेते एकवटणार आहेत. राज्यातील ओबीसी नेते एकत्र येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले निधनावर भुजबळ यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, त्यांच्या जाण्याने मला धक्का बसला. कर्डिले हे एक पैलवान होते. ते माझ्यासोबत मंत्री मंडळात होते. त्यांचं हे जाण अनपेक्षित आहे.नियतीच्या मनात काय असतं सांगता येत नाही. त्यांना आदरांजली अर्पण करतो.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ही सभा आयोजित करण्यात आली असून त्यांच्यासोबत ओबीसींच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे संबोधित करणार आहेत, त्यामुळे छगन भुजबळांच्या सोबत धनंजय मुंडे देखील या व्यासपीठावर दिसणार आहेत. सोबतच या महाएल्गार सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर , ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे देखील उपस्थित असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























