(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : छगन भुजबळांना वेड लागलंय; मनोज जरांगेंची खोचक टीका
Manoj Jarange Patil : 13 जानेवारी रोजी छगन भुजबळ यांची बीडमध्ये महासभा होणार असून, याच सभेपूर्वी मनोज दरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बीड : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या बीडमध्ये (Beed) होणाऱ्या सभेवर मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) पहिली प्रतिक्रिया आली आहे. छगन भुजबळ यांना वेड लागलं, मात्र लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा त्यांना अधिकार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 13 जानेवारी रोजी छगन भुजबळ यांची बीडमध्ये महासभा होणार असून, याच सभेपूर्वी मनोज दरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसमधून आरक्षण देण्यात येऊ नयेत या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून राज्यभरात ओबीसी मेळावे आयोजित केले जात आहे. दरम्यान, 13 जानेवारी रोजी बीडमध्ये या ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित असणार आहे. यावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "छगन भुजबळ यांना वेड लागला आहे. परंतु, लोकशाहीमध्ये त्यांना देखील सभा घेण्याचा अधिकार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. बीडमध्ये एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी मनोज जरांगे पाटील हे बीड शहरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
तीन कोटी मराठा बांधव मुंबईला जाणार...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारी मनोज जरांगे मुंबईला पायी दिंडी काढणार आहे. आंतरवाली सराटी ते मुंबई अशी ही पायी दिंडी असणार आहे. दरम्यान, आंतरवाली येथून मुंबईसाठी तीन कोटी मराठा बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी पाय निघालेल्या रॅलीमध्ये सहभागी होतील असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
भुजबळांची बीडमध्ये महासभा
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली होती. त्या सभेमध्येच मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता छगन भुजबळ यांची देखील बीडमध्येच महासभा होणार असून, त्या सभेमध्ये छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यावर प्रतिक्रिया देतांना जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, 'छगन भुजबळ यांना वेड लागले असून, लोकशाहीने ते सभा घेऊ शकतात,” अशी जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांच्या सभांचा धडाका...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांच्या राज्यभरात सभा झाल्या, त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांचे देखील राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ओबीसी मेळावे आयोजित केले जात आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी भुजबळ यांच्या मराठवाड्यात सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. कारण 13 जानेवारी रोजी भुजबळ यांची बीडमध्ये सभा होणार असून, त्यापूर्वी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे येत्या 7 जानेवारीला भुजबळ यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व सभांमधून भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: