चिंता वाढणार! बीड जिल्ह्यात 79 टक्के पाऊस, धरणांमध्ये केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक
Beed Rain : 143 लहान मोठ्या प्रकल्पामध्ये अजूनही पाण्याची कोणतेही आवक झालेली नाही. धरण क्षेत्रातील परिसरामध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठ्यात वाढ होत नाही.
बीड : यंदा मराठवाड्यात (Marathwada) अपेक्षित पाउस (Rain) झाला नसल्याने परीस्थिती गंभीर होत चालली आहे. मान्सून संपत आला तरी अनेक जिल्ह्यात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. अशीच काही परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील धरणामध्ये फक्त 18 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर, बीड जिल्ह्यात आतापर्यंत 79 टक्के पावसाची नोंद झाली असून, 143 लहान मोठ्या प्रकल्पामध्ये अजूनही पाण्याची कोणतेही आवक झालेली नाही. धरण क्षेत्रातील परिसरामध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठ्यात वाढ होत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.
यावर्षी माजलगाव प्रकल्पात 12 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असून, बीड तालुक्यातील बिंदूसरा धरणामध्ये 18 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर, शिरूर तालुक्यातल्या शिंदफना प्रकल्पात 57 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पुरेसा पाऊस न झाल्याने या धरणामध्ये पाण्याची वाढ झालेली नाही. तर, यावर्षी पेरणीची टक्केवारी वाढली असून, पावसाअभावी उत्पन्न देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता परतीच्या पावसाकडे लक्ष...
यंदा मान्सून उशिरा आला. त्यात जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाने दिलासा दिला, मात्र पुन्हा ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यात सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेवटच्या 10 दिवसांत काही प्रमाणात पाउस झाला. त्यामुळे यंदा परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पीकं करपून गेली आहे. मात्र, उरल्यासुरल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे लक्ष लागले आहे.अन्यथा बीड जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
बीड जिल्ह्याच्या पावसाची स्थिती...
- बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 566.1 मिमी एवढी असून, आतापर्यंत 449.2 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 79 टक्के पाउस झाला आहे.
- बीड तालुक्याची वार्षिक सरासरी 594.5 मिमी असून, आतापर्यंत 423.3 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 70.9 टक्के पाउस झाला आहे.
- पाटोदा तालुक्याची वार्षिक सरासरी 538.7 मिमी असून, आतापर्यंत 430.7 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 79.7 टक्के पाउस झाला आहे.
- आष्टी तालुक्याची वार्षिक सरासरी 546.1 मिमी असून, आतापर्यंत 514.2 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 93.7टक्के पाउस झाला आहे.
- गेवराई तालुक्याची वार्षिक सरासरी 587.0 मिमी असून, आतापर्यंत 362.4 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 61.5टक्के पाउस झाला आहे.
- माजलगाव तालुक्याची वार्षिक सरासरी 616.9 मिमी असून, आतापर्यंत 434.9 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 70.2 टक्के पाउस झाला आहे.
- अंबेजोगाई तालुक्याची वार्षिक सरासरी 632.4 मिमी असून, आतापर्यंत 601.4 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 94.7 टक्के पाउस झाला आहे.
- केज तालुक्याची वार्षिक सरासरी 583.6 मिमी असून, आतापर्यंत 565.7 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 96.6 टक्के पाउस झाला आहे.
- परळी तालुक्याची वार्षिक सरासरी 628.1 मिमी असून, आतापर्यंत 368.4 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 58.4 टक्के पाउस झाला आहे.
- धारूर तालुक्याची वार्षिक सरासरी 669.8 मिमी असून, आतापर्यंत 468.4 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 69.7 टक्के पाउस झाला आहे.
- वडवणी तालुक्याची वार्षिक सरासरी 600.7 मिमी असून, आतापर्यंत 360.5 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 59.8 टक्के पाउस झाला आहे.
- शिरूर तालुक्याची वार्षिक सरासरी 515.6 मिमी असून, आतापर्यंत 394.7 मिमी पाउस झाला आहे. म्हणजेच 76.2 टक्के पाउस झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: