Beed : वैजनाथ दर्शन बारी मंडपाचे काम चार वर्षांपासून रखडले, यंदाच्या महाशिवरात्रीत उत्तर पायऱ्यांवरच भाविकांच्या रांगा लागणार
Parli Vaijnath Temple : वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून साधारण 20 कोटी रुपये खर्च करून या दर्शन बारी मंडपाच्या बांधकामाला सुरुवात झाली.

बीड : परळीतील वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दर्शन बारी मंडपाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीलाही वैजनाथ मंदिराच्या (Shri Vaijnath Temple) उत्तर पायऱ्यांवरच भाविकांच्या रांगा लागणार आहेत. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण असल्याने परळीतील वैजनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
परळीतील वैजनाथ मंदिर परिसरात (Vaijnath Jyotirling Temple) गेल्या चार वर्षापासून सुरू असलेल्या दर्शन बारी मंडपाचे काम आता रखडलेले आहे. चार वर्षाआधी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून साधारण 20 कोटी रुपये खर्च करून या दर्शन बारी मंडपाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्यावेळी ही इमारत दीड वर्षात होणे अपेक्षित होते असे असतानाही चार वर्षे उलटूनही दर्शन बारी मंडपाचे काम रखडलेले आहे.
कोट्यवधी खर्च करूनही काम रखडलं
कोट्यवधी रुपये खर्च करुनही दर्शन बारी मंडपाचे काम रखडल्याने यंदाच्या महाशिवरात्रीतही मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवरच भाविकांच्या दर्शन रांगा असणार आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील रखडलेल्या या दर्शन बारी मंडपाचे काम कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
वैजनाथ मंदिरातील गर्दी वाढल्यास मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर भाविकांच्या रांगा लावण्यात येतात. भाविकांच्या या रांगा दर्शन बारी मंडपातून लावण्यात येणार होत्या. त्याकरता वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून दर्शन बारी मंडप उभारण्यात आला आहे. यात एकूण चार मजले, अद्यावत लिफ्ट अशी या दर्शन बारी मंडपाची रचना करण्यात आलेली आहे. दर्शन मंडपात एकाच वेळी साधारण पंचवीस हजार भाविक रांगेत राहू शकतात.
ही बातमी वाचा:
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















