एक्स्प्लोर

Nashik Namokar Teerth : णमोकार तीर्थावर देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेलांची एकत्रित उपस्थिती; जैन मुनींचे आशीर्वाद अन् मार्गदर्शन घेतलं

Namokar Teerth Panchkalyanak Nashik : नाशिक येथील णमोकार तीर्थक्षेत्रसाठी राज्य सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी केली. 

नाशिक : मालसाणे येथे सुरू असलेल्या जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाच्या ठिकाणी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी जैन मुनींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. त्याचसोबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी जैन मुनींचे मार्गदर्शनही घेतलं. 

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील मालसाणे या ठिकाणी पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचा दुसरा दिवस आहे. त्यानिमित्ताने भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत आहे. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी त्यांचे दर्शन घेतलं. यावेळी जैन मुनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल पटेलांना आशीर्वाद दिले आणि मार्गदर्शन केलं. 

सरकारने भरीव मदत करावी

या प्रसंगी खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, "कुंथुसागर आणि देवनंदी महाराज यांचे दर्शन घेणाचं भाग्य लाभले. पवित्र आणि शुद्धता या णमोकार तीर्थावर आहेत. दिगंबर समाज संख्येने कमी असला तरी देश घडविण्यात अग्रेसर समाज आहे. कोणत्याही क्षेत्रात दिगंबर जैन समाज पुढे आहे. आपल्या धर्मगुरूचे आशीर्वाद आहेत, ते अनवाणी चालतात, त्याग करतात. अशा आपल्या गुरुजनांना नमस्कार करतो. यावेळी णमोकार तीर्थक्षेत्रसाठी राज्य सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी मी करतो."

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मालसाने येथील णमोकार तीर्थ येथे सुरू असलेल्या पंचकल्याणक महोत्सवात मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या  या महोत्सवात आज सकाळी 6.30 वाजल्यापासून यज्ञशाळेत अभिषेक आणि हवनाने  दिवसाची सुरुवात झाली आहे. भगवान जन्मकल्याणक विधीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आहेत.

पाच मुमुक्षूंनी जैनेश्वरी दीक्षा अंगिकारली

श्री नमोकार तीर्थच्या प्रांगणात सुरू असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवचा दुसरा दिवस एक अत्यंत भक्तिमय, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक सोहळ्याने उजळला. त्याग आणि वैराग्याच्या अद्वितीय भावनेने या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली होती, ज्यात पाच मुमुक्षूंनी संसाराचा त्याग करून ‘जैनेश्वरी दीक्षा’ अंगीकारली.

शनिवारच्या दिवशी गणधराचार्य 108 श्री कुंथुसागरजी महाराज आणि सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज यांच्यासह अनेक दिगंबर मुनीराज आणि आर्यिका माताजींच्या सान्निध्यात हे उदात्त दीक्षा संस्कार संपन्न झाले. पाच मुमुक्षूंनी संसाराचा त्याग करीत दीक्षा स्वीकारल्याने तीर्थ प्रांगण भक्तांनी भरून गेलं. या कार्यक्रमामुळे चांदवडनगरी साधकांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण झाली आणि तीर्थधामचा परिसर भक्तिभावाने गाजला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Gas Shortage: गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
Nashik Mhada Fraud: नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: खिडकीला दोर बांधून कोणी फास लावेल का? डॉ. मनीषा जेजुरकरांच्या बहिणीचा सवाल, निलेश जेजुरकरांशी अफेअर असणारी महिला डॉक्टर गोत्यात येणार
खिडकीला दोर बांधून कोणी फास लावेल का? डॉ. मनीषा जेजुरकरांच्या बहिणीचा सवाल, निलेश जेजुरकरांशी अफेअर असणारी महिला डॉक्टर गोत्यात येणार
Nashik Rangpanchami 2026: नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget