एक्स्प्लोर

मोठी बातमी ! सतीश भोसले उर्फ 'खोक्या 'चा जामीन मंजूर, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत न्यायालयाचा निर्णय

पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आलं होता.

Beed:भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे . शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला आहे. आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सध्या खोक्या बीड कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आलं होता. याप्रकरणी अँडव्होकेट राजन धसे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

खोक्या भाईची कशामुळे चर्चा होती?

शिरूर मधील दिलीप ढाकणे आणि त्याचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचे दहशत चर्चेचा विषय बनली होती .गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सतीश भोसले विरोधात गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत .प्राणघातक हल्ला, फसवणूक, खूनाचा गुन्हा असे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून वन विभागाच्या जागेवर दुमजली इमारत आणि त्या बाजूला आलिशान ऑफिस मधून सतीश भोसले त्याचा कारभार चालवत असल्याचं समोर आलं होतं .त्यानंतर वन विभागाने त्याच्या घरावर ऑफिसवर बुलडोझर चालवल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती . काही महिन्यांपूर्वी सतीश भोसले च्या घरावर वनविभागाने कारवाई केली होती .त्यानंतर त्याच्या घरात शिकारीचे साहित्य तसेच वन्यजीवांचे मास आढळून आले होते .

*सतीश भोसले उर्फ खोक्या वर तीन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. यातील वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात सतीश भोसलेला जामीन मंजूर झाला आहे.

*बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. 

*शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सतीश भोसले वर दुसरा गुन्हा दाखल झाला. 

*तर सतीश भोसलेच्या घराच्या तपासणीत वन्य जीवांचे मांस आढळून आल्याने त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

*या तीनही प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. न्यायालयाने एका गुन्ह्यात त्याचा जामीन मंजूर केला आहे

कोण आहे सतीश भोसले ?

सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे . मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय होता .भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी व भाजपचा पदाधिकारी अशी त्याची ओळख आहे .सतीश भोसले वर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे .काही महिन्यांपूर्वी समाज माध्यमांवर दहशत पसरवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते .वनविभागाची कारवाई व घरात सापडलेल्या ऐवजामुळे बीडमध्ये व राज्यभर खोक्या भाईची एकच चर्चा होती .

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'
‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget