एक्स्प्लोर

Beed : बीडमध्ये क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात, पंकजा मुंडेंनाही धक्का; अजित पवारांनी गड राखला

Beed Nagarpalika Election Result : बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजयाने एकाच वेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे योगेश क्षीरसागर यांना धक्का बसला आहे.

बीड : राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील बीड नगरपालिकेतील (Beed Nagarpalika Election) क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात आली आहे. बीड नगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली असून प्रेमलता पारवे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. तर नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांना लोकांनी नाकारल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजयामागे मुस्लिम मतांचा निर्णायक कौल असल्याची चर्चा आहे.

बीड नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या क्षीरसागर घराण्याची सत्ता आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत गेले, तर योगेश क्षीरसागर हे ऐनवेळी भाजपमध्ये गेले. त्यांच्यामागे पंकजा मुंडे यांनी पूर्ण ताकद लावली. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी ही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांनी भाजपच्या डॉ. ज्योती घुम्रे यांचा पराभव केला. तर शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या विजयामुळे क्षीरसागर बंधूंना मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.

Beed Nagarpalika Election Result : बीडमधील पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी अजित पवार गट - 18

भाजप - 14

राष्ट्रवादी शरद पवार गट - 11

शिवसेना शिंदे गट - 3

शिवसेना ठाकरे गट - 1

एमआयएम - 2

काँग्रेस - 1

Georai Election Result : गेवराईमध्ये विजयसिंह पंडितांना धक्का

बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रावादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडितांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगरपरिषदेतील पंधरा वर्षांची सत्ता कायम राखली. गेवराईत भाजपचा दणदणीत विजय झाला. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार निवडून आल्या. त्यानंतर गेवराईमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. हा जनतेचा विजय असून जनतेनं मला कौल दिला अशी प्रतिक्रिया गीता पवार यांनी दिली.

Parli Election Result : परळीमध्ये मुंडे भावंडांची जादू

नगर परिषद निवडणुकीत मुंडे भाऊ-बहिणीची जादू पाहायला मिळाली. परळी नगर परिषद निवडणुकीत मुंडे भावंडांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकला. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि रिपाइंच्या महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. महायुतीच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी 15 हजार 662 मतांनी विजय मिळवला. या विजयानंतर आमदार धनंजय मुंडेंनी परळीकरांचे आभार मानले आहेत..

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget