एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Beed News : ऐन दिवाळीत पोलिसांनी केली धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणात 181 जणांची दिवाळी जेलमध्ये

Maratha Reservation : बीड पोलिसांनी (Beed Police) आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकल्या आहे.

बीड : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनालात घुसून काही अज्ञात लोकांनी राजकीय नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाळपोळ केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, बीड पोलिसांनी (Beed Police) आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकल्या आहे. यातील काही जण पोलिस कोठडीत, तर काही कारागृहात आहेत. त्यामुळे या आरोपींना दिवाळी (Diwali) जेलमध्ये साजरी करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये पोलिसांनी आणखी 400 जणांची ओळख पटवली आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरु असतानाच, 30 व 31 ऑक्टोबर रोजी बीडमधील आंदोलक आक्रमक झाले. पाहता पाहता शहरात जाळपोळ सुरु झाली. राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीआरएसचे दिलीप गोरे यांची कार्यालये पेटवून देण्यात आली. माजलगाव येथील नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके,  आमदार संदीप क्षीरसागर यांचे राहत्या घरांना आग लावण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक करण्याची मोहीम राबवली आहे. ज्यात आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकण्यात आले आहे. 

ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड

शांततेत चाललेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. अचानक सुरु झालेल्या जाळपोळीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. ज्यात आतापर्यंत 500 पेक्षा अधिक लोकांची ओळल पटली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांना अटक करून जेलमध्ये तर काहींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तसेच अजूनही पोलिसांची धरपकड सुरूच आहे. ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड सुरु असल्याने अनेकांनी शहर सोडले आहे. मात्र, या सर्व आरोपींना शोधून इतर जिल्ह्यात जाऊन पोलीस त्यांना ताब्यात घेत आहे. 

आमच्यासाठी फक्त गुन्हेगार आरोपीच...

दरम्यान, विशेष समाजातील तरुणांना जाणीवपूर्वक अटक करून जेलमध्ये टाकण्यात येत असल्याचा आरोप बीड पोलिसांवर करण्यात येत आहे. मात्र, यावर पोलिसांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "बीड जाळपोळ प्रकरणात हल्लेखोरांची ओळख पटवूनचं प्रत्येक आरोपी ताब्यात घेतला जात आहे. उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. त्यानंतर अटकेची कारवाई होत आहे. त्यामुळे जाळपोळ करणारे कोणत्या समाजाचे आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नसून, आमच्यासाठी आरोपी हा आरोपीच आहे हे महत्वाचे असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed News : बीडमधील हिंसाचाराची एसआयटी चौकशी व्हावी, धनंजय मुंडेंची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्लाMaharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget