एक्स्प्लोर

सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी मोठी अपडेट; हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल - कोयते जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल

Beed Firing News: आंधळे खून प्रकरणी अटकेत असलेल्या चौघांना परळी प्रथमवर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  मुख्य आरोपींना मदत केल्याच्या संशयातून केज आणि धारूर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

बीड : बीडच्या (Beed Firing News)  परळी गोळीबारप्रकरणी (Parali Fire)  चारही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  मात्र मुख्य आरोपी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीत्ते फरार आहेत. तसेच मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे ( Bapu Andhale) यांच्यावर गोळी झाडून कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती.  या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गावठी पिस्तूल आणि कोयते जप्त करण्यात आले आहेत. बीडमधील परळी शहरात बँक कॉलनी परिसरात शनिवारी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंधळे खून प्रकरणी अटकेत असलेल्या चौघांना परळी प्रथमवर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केज परिसरातून पोलिसांनी यांना काल ताब्यात घेतले होते, त्यांना अटक करून आज परळी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या चारही जणांना  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.  मुख्य आरोपींना मदत केल्याच्या संशयातून केज आणि धारूर पोलिसांनी आसाराम दत्ता गव्हाणे, मयुर सुरेशराव कदम, रजतकुमार राजेसाहेब जेधे, अनिल बालाजी सोनटक्के या चौघांना ताब्यात घेतले. मात्र, अजूनही मुख्य आरोपी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, वाघबेट, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे हे फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत.

काय आहे प्रकरण?

परळीमधील मरळवाडी येथील सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बँक कॉलनी परिसरात हा गोळीबार झाल्यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. दोघांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात उपचार सुरु होते.  याप्रकरणी पाच जणांविरोधात खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या व्यवहारातून ही घटना घडल्याचे पोलिस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सुरु झाले असून आरोपींचा शोध सुरु आहे.

राजकीय वादातून गोळीबार

पैशांच्या वादातून घटना घडल्याचे सांगण्यात येत असले तरी या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे. सरपंच बापू आंधळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि निवडणुकीनंतर अजित पवार गटात प्रवेश करत धनंजय मुंडे यांची साथ दिली. पैशाच्या व्यवहारातून या दोन गटात गोळीबार झाला असला तरी या ठिकाणी धनंजय मुंडे गट आणि बबन गीते गट असाच हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा :

'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पाABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi NewsPolice Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Embed widget