एक्स्प्लोर

Beed Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्या बापाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; बीडमधील घटना

Beed Crime News : मुलाकडून झालेल्या मारहाणीत बापाचा तीन दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Beed Crime News : बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोटाच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या (Murder) केली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने या आरोपी मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली होती. दरम्यान या मारहाणीत बापाचा तीन दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथे ही घटना घडली आहे. तर या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांतीलाल सूर्यभान नरवडे (वय 54 वर्षे) असे मृताचे नाव आहे. तर योगेश नरवडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथील योगेश नरवडे याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे दारूसाठी पैसे मागत तो नेहमी घरात वाद घालायचा. त्याने 7 जून रोजी वडिलाकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिले. त्यामुळे रागाच्या भरात योगेशने  कांतीलाल नरवडे यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने  नातेवाईकांनी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, 10 जुलै रोजी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी मयताची पत्नी नर्मदाबाई कांतीलाल नरवडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात योगेशवर गुन्हा दाखल केला आहे.

योगेशला दारू पिण्याची सवय असल्याने 7 जुलै रोजी त्याने वडीलांकडे पैसे मागितले. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्याने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाल्याचे कळताच योगेश पळून जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी पथकासह योगशचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतेले आहे. तसेच त्याच्यावर वडिलांचा खून केल्याचा गुन्हा दाखला करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

दारूच्या सवयीमुळे कुटुंब उद्धवस्त...

दारूच्या सवयीमुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाली आहे. असाच काही प्रकार या घटनेत देखील समोर आला आहे. आरोपी योगेशला दारूची सवय होती. त्यामुळे दारूला पैसे नसल्यास तो घरात येऊन वाद घालायचा. यातूनच त्याने आपल्या जन्मदात्या बापावर हात उचलला. त्याच्या मारहाणीत वडिलांचा जीव गेल्याने घरातील महत्वाचा व्यक्ती गेला. तर योगेशला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दारूच्या सवयीमुळे नरवडे कुटुंब उध्वस्त झाले आहे. तर या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed News: धक्कादायक! स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या; बीड जिल्ह्यातील घटना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
Beed Crime News: वंशाला दिवा पाहिजे, तीन मुली झाल्या म्हणून सासरच्याचं सुनेसोबत भयानक कृत्य, नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला परवानगीसाठी जबरदस्ती, चिमुकल्या मुलींवरचं आईचं छत्र हरपलं
वंशाला दिवा पाहिजे, तीन मुली झाल्या म्हणून सासरच्याचं सुनेसोबत भयानक कृत्य, नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला परवानगीसाठी जबरदस्ती, चिमुकल्या मुलींवरचं आईचं छत्र हरपलं
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget