एक्स्प्लोर

Beed Crime News: बीडमध्ये शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला; बिझनेस पार्टनर जीवावर उठला? मध्यरात्री 'त्या' माणसाने मदत मागितली अन्...

Beed Crime News: मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर बोलावून दबा धरलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विलास भारत म्हस्के (वय ३२) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड : शहरालगतच्या पालवण गावात मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक विलास भारत म्हस्के (वय ३२) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर बोलावून दबा धरलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विलास भारत म्हस्के (वय ३२) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक व्यवहारातून व्यावसायिक भागीदारानेच हा हल्ला घडवून आणल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विलास मस्के गुरुवारी रात्रीच्या सुमारास आपल्या घरामध्ये झोपलेले होते. मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी वाजवला. यावेळी म्हस्के यांच्या बहिणीने दार उघडले असता, एका अनोळखी व्यक्तीने 'गाडीतील पेट्रोल संपले आहे, पेट्रोल हवे आहे,' असं सांगितले. अपरात्री एक अनोळखी व्यक्ती मदत मागत असल्याने विलास म्हस्के बाहेर आले. ते बाहेर येताच दबा धरून बसलेल्या अन्य चार ते पाच जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी डोक्यावर व हातावर वार केल्याने म्हस्के गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी म्हस्के यांनी आपल्या व्यावसायिक भागीदारावर संशय व्यक्त केला आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातूनच हा हल्ला घडवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचेही म्हणणे आहे. हल्ल्यात सामील असलेले पाच अनोळखी जण अद्याप फरार आहेत. विलास म्हस्के यांच्या तक्रारीवरून व्यावसायिक भागीदारासह पाच अनोळखी हल्लेखोरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Embed widget