Beed: आष्टीत औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने तणाव, हिंदू संघटनांकडून बंदचा निर्णय; शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
Beed Ashti News: धार्मिक भावना दुखवल्या असून दोन समजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले असल्याची तक्रार आष्टी ठाण्यात दिली.
![Beed: आष्टीत औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने तणाव, हिंदू संघटनांकडून बंदचा निर्णय; शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन Beed Aurangzeb status in Ashti tension over controversial status on whatsapp Beed: आष्टीत औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने तणाव, हिंदू संघटनांकडून बंदचा निर्णय; शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/09/6b45df184471fc2b5f15de0c7b4c7e87168628225076389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : बीडच्या आष्टी ( Beed Ashti) शहरातील आझादनगरमध्ये एका तरुणाने औरंगजेबचं स्टेट्स ठेवल्याने काल रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या आवाहनानंतर आज आष्टी बंद आहे. या स्टेटसमुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
"बाप तो बाप रहेगा" अशा आशयाचे वाक्य टाकून धार्मिक भावना दुखवल्या असून दोन समजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले असल्याची तक्रार आष्टी ठाण्यात दिली. त्या तक्रारीवरून जैद अय्युद सय्यद च्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआय भाऊसाहेब गोसावी हे करत आहेत. शुभम शहाराम लोखंडे (वय-23वर्षे, रा.माळी गल्ली)आष्टी यांच्या फिर्यादीवरून आष्टी येथील रहीवाशी झैद अय्युब सय्यद यांचे इंन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता त्याच्या अकाऊंटवर लबेका ग्रुप आष्टी या पेज वर औरंगजेब यांचा फोटो व त्या फोटोला "बाप तो बाप रहेगा" असे वाक्य टाकलेले दिसू आले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
धार्मिक भावना दुखवल्या असुन दोन समजामध्ये तेड निर्माण होईल असे कृत्य केले असल्याची तक्रार आष्टी ठाण्यात दिली त्या तक्रारीवरून जैद अय्युद सय्यदच्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घडलेल्या प्रकारनंतर पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अहमदनगरच्या मिरजगावमधील बंद मागे
अहमदनगरच्या मिरजगावमधील बंद मागे घेण्यात आला आहे. कोल्हापूर पाठोपाठ अहमदनगरच्या मिरजगाव मधील एका तरुणाने औरंगजेबाची पोस्ट समाज माध्यमावर टाकल्याने तणाव निर्माण झाला होता. या पोस्टच्या निषेधार्थ काल मिरजगाव बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोणीही कायदा हाती घेऊ नये : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, याचा शोध घ्यावा लागेल. या घटनांच्या मागे कोण आहे, याचाही शोध घेतला जाईल. जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी तर अशा अवलादी पैदा केलेल्या नाहीत ना, याचाही शोध घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि कायदा हाती घेऊ नये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे औरंग्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही आणि असे करणार्यांना माफी नाहीच, असेही त्यांनी ठणकावले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)