Beed : माजलगावात कारची भीषण धडक, अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
Beed News : माजलगाव तेलगाव रोडवर आज संध्याकाळी स्विफ्ट आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला.
Beed Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर ( Accident on Pune Solapur Highway )आज सकाळी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमधील (Beed) माजलगाव येथे भीषण अपघात झाला आहे. माजलगाव तेलगाव रोडवर संध्याकाळी स्विप्ट आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. माजलगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपघातावेळी उपस्थित असणाऱ्यांची आणि गाडी चालकांची चौकशी करत आहेत. (Maharashtra Road Accident )
माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ स्विफ्ट गाडीने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये लहामेवाडी येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण उपचारादरम्यान मृत पावला. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान, हा भीषण अपघात झाला. अपघातावेळी उपस्थित असणाऱ्यांनी अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांनी दिली. पोलिसही घटनास्थळावर पोहचले आहेत. ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
लहामेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय 32), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय 30) आणि आण्णासाहेब बळीराम खटके हे तिन्ही तरुण तेलगाव येथील कापूस जिनिगवर कार्यरत होते. ते दररोज दुचाकीने येथे कामाला ये जा करतात. आज रात्री ते काम आटोपून तेलगावहून लहामेवाडीकडे परत येत होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला माजलगाव - तेळगाव रोडवर गावकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली. ही धडक इतकी मोठी होती की, त्यात लहामेवाडी येथील दुचाकीवरील लक्ष्मण कापसे, आण्णासाहेब खटके हे जागीच ठार झाले. तर नितीन हुलगे यास उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
एकाच गावातील तीन तरुणांचा अपघात मृत्यू झाल्यामुळे माजलगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या अपघाताची माहिती घेत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. उपस्थितांनी अपघाताबद्दल पोलिसांना कळवले होते. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
दौंडमधील अपघातात चार जणांचा मृत्यू
पुणे सोलापूर महामार्गावर आज सकाळी अपघात झाला होता. दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये पहाटे बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
आणखी वाचा :
Daund Accident: दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये बस आणि ट्रकचा अपघात, चार जणांचा मृत्यू, 20 जण जखमी