Daund Accident: दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये बस आणि ट्रकचा अपघात, चार जणांचा मृत्यू, 20 जण जखमी
Pune Daund Accident: बसमधून 50 प्रवासी प्रवास करत होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
![Daund Accident: दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये बस आणि ट्रकचा अपघात, चार जणांचा मृत्यू, 20 जण जखमी Pune Daund Accident Four killed 20 injured in bus and truck accident in Bhanggaon in Daund taluka Daund Accident: दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये बस आणि ट्रकचा अपघात, चार जणांचा मृत्यू, 20 जण जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/9c30944ef0d823d7a88869a6b8164ebf167522390562889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये (Daund Accident) भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बस ट्रकला धडकली आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. बसमधून 50 प्रवासी प्रवास करत होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघाली होती. बसचा अचानक टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोठ्या ट्रकला ही बस जाऊन ही बस धडकली. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली आहे. अपघातात जखमींना नजीकच्या केडगाव मधील हॉस्पिटलमध्ये तसेच पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)