एक्स्प्लोर

मोठी बातमी! आमदार प्रकाश सोळुंकेंच्या घरावर हल्ला करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन

MLA Prakash Solanke : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून, जाळपोळ करण्यात आली होती.

बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून माजलगावमध्ये (Majalgaon) जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना माजलगावचे अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक करून, जाळपोळ करण्यात आली होती. त्याचबरोबर नगरपरिषद कार्यालय देखील पेटवून देण्यात आले होते. यामध्येच अटक करण्यात आलेल्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेली जाळपोळ आणि दगडफेकीच्या संशयावरून 20 लोकांच्या विरोधात बीडच्या माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत अटक सत्र सुरु केले. ज्यात एकूण 17 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. हे सर्व संशयित आरोपी एक महिन्यापासून जिल्हा कारागृहामध्ये होते. दरम्यान, अखेर या 17  संशयित आरोपींना माजलगावच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

पोलीस प्रशासन लागलं कामाला...

माजलगाव व बीड शहरातील जाळपोळीच्या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळत आहे. या प्रकरणात लक्षवेधी झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, याची तत्काळ दखल घेत बीड पोलीस प्रशासन कामाला लगले असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार, अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवत, आंदोलनातील गुन्ह्यात जे आरोपी आहेत ते शोधून त्यांना अटक करा असे आदेश दिले आहेत. प्रत्येक गुन्ह्यांचा लवकरात लवकर निपटारा करा, अशा सूचना सुद्धा पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

आमदार प्रकाश सोळुंके यांचे गंभीर आरोप...

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोळुंके यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, याचवेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. "अवैध धंदे आणि राजकीय विरोधकांनी कट रचून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रकाश सोळंके यांनी आरोप केला. तर यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला होता. काही हल्लेखोरांकडे धारदार शस्त्र देखील होती, त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले असावे असे देखील सोळके म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

पोलिसांचा फोर्स कमी, त्यामुळेच आमदार सोळंकेंच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; पोलिसांची कबुली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget