(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed : राष्ट्रवादीच्या आमदारानं घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट, बीड जिल्ह्यात खळबळ
Beed : माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख (BRS) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K. Chandrashekar Rao) यांची भेट घेतली
Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख (BRS) आणि तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K. Chandrashekar Rao) यांची भेट घेतली आहे. सोळंके यांनी हैदराबादमध्ये त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर बीड (Beed) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Telangana Farmers : तेलंगणामधील शेतकऱ्यांसारखे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जगता यावं
तेलंगणामधील शेतकरी हा सर्वगुणसंपन्न आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील तेलंगणामधील शेतकऱ्यांसारखे सुखी आणि समाधानाचे जीवन जगता आले तर खूप बरे होईल अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. यावेळी आमदार बालका सुमन तसेच भारत राष्ट्र समितीच्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम हे देखील उपस्थिती होते.
Haribhau Rathod : आपचे (AAP) राज्य उपाध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा BRS मध्ये प्रवेश
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे महाराष्ट्रातील एक तगडा नेता BRS ला मिळाला आहे. तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांची प्रगती होत आहे. तसेच तेथील विकासात्मक कामाची माहिती घेतल्यानंतर आपल्याला देखील महाराष्ट्रात बी आर एस च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येतील या भावनेतून आपण प्रवेश करत असल्याचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन बी आर एस मध्ये स्वागत केले.
राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांचीही घेतली भेट
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. आपली क्षमता आजमावून पाहण्याच्या पहिला प्रयत्न केसीआर यांनी महाराष्ट्रापासून सूरू केला आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. त्याशिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचीही केसीआर यांच्यासोबत भेट झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
केसीआरच्या पक्षाचा मराठी शिलेदार कोण ? तीन मोठ्या नेत्यांची चर्चा