एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला 3 तास कार्यालयात कोंडलं!
अकोला : तुरीचा थकीत चुकारा न दिल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याला तीन तास कार्यालयात कोंडलं. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत रक्कम देण्याचं आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्याची सुटका करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील तुरीच्या थकीत चुकाऱ्याचे 20 कोटी रुपये उद्याच मिळणार आहेत. तर अमरावती विभागातील थकीत 74 कोटी 10 जुलैपर्यंत मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
तूर खरेदी सुरु करणे आणि दोन महिन्याचा थकीत चुकारा देण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरेंना कार्यालयात तीन तास कोंडलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement