Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्याचे संकेत देणाऱ्या ए. आर. रहमान यांनी 'छावा' सिनेमाबाबत केलेल्या जुन्या वक्तव्यावर नुकतीच बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 2025 मध्ये आलेल्या 'छावा' सिनेमानं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिस (Chhaava Box Office Collection) हादरवलं. विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर सिनेमानं बक्कळ गल्ला जमवलेला. या सिनेमाची क्रेझ संपूर्ण भारतभरात पाहायला मिळालेली. लक्ष्मण उत्तेकर (Director Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' सिनेमात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा दाखवण्यात आलेली. मराठ्यांचं शौर्य आणि गर्व सांगणाऱ्या या सिनेमावर सर्वांनीच स्तुतीसुमनं उधळलेली. पण, याच सिनेमाला म्युझिक देणाऱ्या दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांनी मात्र, या सिनेमाचा प्रपोगंडा फिल्म असा उल्लेख केलेला. ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या याच वक्तव्यावर आता बॉलिवूडच्या (Bollywood News) सुप्रसिद्ध लेखकानं प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, जर तो एखादा 'प्रोपगंडा' सिनेमा होता, तर तुम्ही तो करायला नको होता, असं वक्तव्य बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध लेखकानं (Bollywood Writer) केलं आहे.
बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्याचे संकेत देणाऱ्या ए. आर. रहमान यांनी 'छावा' सिनेमाबाबत केलेल्या जुन्या वक्तव्यावर नुकतीच बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, कदाचित सिनेसृष्टीतील लोकांशी चांगले संबंध न राखल्यामुळेच रहमान यांना काम मिळत नसावं, असंही मनोज मुंतशीर म्हणाले आहेत.
'छावा'ला प्रपोगंडा म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना मनोज मुंतशिर काय म्हणाले? (Manoj Muntashir On A. R. Rahman)
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना मनोज मुंतशीर म्हणाले की, "जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनले, जेव्हा एखादा मुस्लिम देशाचे राष्ट्रपती बनले, किंवा ए. आर. रहमान यांच्यासारखा दिग्गज, ज्यांचं या देशातील स्थान अद्वितीय आहे आणि ज्यांच्यासाठी त्यांची धार्मिक ओळख किंवा चिन्हे गौण ठरतात आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला... तेव्हा 'मीच का?' किंवा 'मुस्लिमच का?' असा प्रश्न का उपस्थित केला गेला नाही? जर काही कारणास्तव तुम्हाला आज काम मिळत नसेल, तर इतर कारणांचा शोध का घेऊ नये?"
पुढे बोलताना ते म्हणाले की, "असं होऊ शकतं की, तुमचे प्रोफेशनल रिलेशन बिघडले असतील किंवा कदाचित तुमची गाणी फारशी यशस्वी ठरली नसतील. याची अनेक कारणं असू शकतात. जेव्हा कधी माझी त्यांची भेट होईल, तेव्हा मी त्यांना याबद्दल नक्कीच विचारेन. ते खूप छान बोलतात आणि मला ए. आर. रहमान साहेबांना थेट विचारायला आवडेल. मी मैदान (Maidaan) सिनेमासाठी त्यांच्यासोबत काम केलंय, त्यातील गाणी उत्कृष्ट झाली होती आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभवही खूप छान होता..."
"प्रपोगंडा फिल्म होती, मग तुम्ही करायला नको होती..."
मनोज मुंतशीर यांनी विक्की कौशल स्टार सिनेमा 'छावा'ला प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांच्या वक्तव्यावर रिअॅक्शन दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "सुरुवातीलाच तुम्ही त्या सिनेमाशी स्वतःला जोडायलाच नको होतं... सिनेमा बनण्यापूर्वी तुम्हाला त्याची पटकथा (Script) ऐकवली गेली नव्हती, असे तर नाही ना? तुम्ही काही अचानक म्युझिक द्यायला सुरुवात केली नाही, तुम्ही नक्कीच पटकथा वाचली असणार, बरोबर? त्यामुळे, जर तो एखादा 'प्रोपगंडा' सिनेमा होता, तर तुम्ही तो करायला नको होता... पण त्या सिनेमावर काम करून झाल्यानंतर त्याला 'प्रोपगंडा' सिनेमा म्हणणं मला अजिबात समजत नाही, सॉरी..."
'छावा' सिनेमाबाबत काय बोललेले ए.आर. रहमान? (A. R. Rahman On Chhaava Movie)
BBC एशियन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत ए. आर. रहमान यांनी 'छावा' सिनेमाबाबत आपलं मत व्यक्त केलेलं. 'छावा' सिनेमा लोकांमध्ये फूट पाडणारा किंवा विभाजनाची विचारसरणी निर्माण करणारा आहे... तरीसुद्धा सिनेमाचा मुख्य उद्देश शौर्य दाखवणं हाच आहे..."
ए.आर. रहमान यांनी सांगितलं की, त्यांनी दिग्दर्शकाला विचारलेलं की, विशिष्ट सिनेमासाठी त्यांची निवड का करण्यात आली? त्यावर दिग्दर्शकानं उत्तर दिलं की, या भूमिकेसाठी तेच एकमेव योग्य व्यक्ती होते. रहमान यांनी पुढे असंही म्हटलं की, हा सिनेमा पाहण्यासारखा असला तरी केवळ सिनेमामुळे लोक सहजासहजी प्रभावित होत नाहीत, कारण प्रत्येक व्यक्तीची योग्य आणि अयोग्य गोष्टींबाबत स्वतःची अशी समज असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















