Car Care Tips : 'या' चुकांमुळे तुमची कार कमी मायलेज देऊ लागते, जाणून घ्या कारची योग्य काळजी कशी घ्याल?
Car Care Tips : बहुतेक गाड्यांमध्ये अनावश्यक वस्तू ठेवलेल्या दिसतात, अशा वस्तू कारमधून काढून टाकल्या पाहिजेत.
Car Care Tips : आजकाल कार जवळपास सगळ्यांकडेच असते. मात्र, बहुतेकांना आपल्या कारमधून चांगलं मायलेज मिळत नाही. याचं कारण म्हणजे कारचा आकार. कारच्या लहान आकारामुळे त्यातून जास्त मायलेज मिळत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही अतिशय सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या कारला चांगले मायलेज मिळवून देऊ शकता.
कार सहजतेने चालवा
अनेक वेळा लोक कार चुकीच्या पद्धतीने चालवतात. किंवा अति स्पीडने चालवतात. मात्र, लोक याकडे सहज दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या गाडीला दोष देत राहतात. लोक बर्याचदा त्यांच्या वाहनाला अॅक्सिलरेटर आणि ब्रेक लावताना दिसतात. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. यामुळे वाहनाच्या इंजिनवर तर वाईट परिणाम होतोच, पण मायलेजही कमी होते. म्हणूनच हा प्रकार टाळला पाहिजे आणि गाडी सुरळीत चालवली पाहिजे.
कारची सर्व्हिंसिंग वेळेवर पूर्ण करा
तुमची गाडी चांगले मायलेज देण्यासाठी, त्याची सर्व्हिसिंग योग्य वेळी पूर्ण करणे देखील गरजेचे आहे. अनेक वेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि वेळ निघून गेल्यावरही गाडीचा वापर सुरू ठेवतात. इंजिन ऑईलमधील वंगण नियोजित वेळ आणि किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर कमी होते, ज्यामुळे इंजिनच्या अंतर्गत पार्टचं नुकसान होतं. गाडीला योग्य वेळी सेवा मिळाल्यास हा प्रकार सहज टाळता येतो.
टायरचा दाब योग्य ठेवा
मायलेजच्या बाबतीत टायर प्रेशर महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच तुमच्या वाहनाच्या टायरचा दाब योग्य ठेवा.
योग्य ठिकाणी तेल टाका
आजकाल बहुतांश पेट्रोल पंपांवर भेसळीच्या तक्रारी येत आहेत. म्हणूनच ज्या ठिकाणी पेट्रोल शुद्ध मिळत असेल अशाच ठिकाणाहून ते भरण्याचा प्रयत्न करा. कारण इंधन योग्य असेल तर मायलेजही चांगले मिळेल.
ठराविक लोकांनी गाडी चालवावी
काही लोकांची गाडी खाजगी असली तरी सरकारी आहे. म्हणजे रोज वेगवेगळे लोक वापरताना दिसतात. प्रत्येकाची गाडी चालवण्याची पद्धत वेगळी असल्याने त्याचा थेट परिणाम इंजिनवर होतो. जर तुम्हाला कार चांगली मायलेज देणारी आणि दीर्घकाळ टिकणारी हवी असेल. तर गाडी ठराविक लोकांनीच चालवावी.
अनावश्यक गाडीमध्ये जास्त वजन ठेवू नका
बर्याच गाड्यांमध्ये अत्यावश्यक वस्तू ठेवलेल्या दिसतात, ज्यांची खऱंतर गरज नसते. अशा वस्तू कारमधून काढल्या पाहिजेत. अनावश्यक उपकरणे वाहनाचे वजन वाढविण्याचे काम करतात, त्यामुळे कारचे मायलेज कमी होते. त्यामुळे गाडीत कमीत कमी सामान ठेवा.
महत्त्वाच्या बातम्या :