Wroley E-scooters : 40,000 कि.मीची वॉरंटी देत Wroley च्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात लॉन्च, 'हे' आहे खास वैशिष्ट्य
Wroley E-scooters : Wroley E-scooters ने अलीकडेच mars, Platina आणि Posh या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Vehicle) बाजारात लॉन्च झाल्या आहेत.
Wroley E-scooters : Wroley E-scooters ने अलीकडेच mars, Platina आणि Posh या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Vehicle) बाजारात लॉन्च झाल्या आहेत. या तिन्ही बजेट फ्रेंडली स्कूटर असून प्र्त्येक स्कूटरची स्वत:ची वेगळी स्टाईल आहे. असे असले तरी त्यांचे टेक्निकल मॉडेल एकमेकांशी मिळते जुळते आहे. कंपनी या स्कूटरच्या बॅटरीवर 40,000 किमीपर्यंतची वॉरंटी देत आहे. या नवीन स्कूटर्समध्ये रिव्हर्स मोड, अँटी थेफ्ट सेन्सर, साइड-स्टँड सेन्सर, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग सेन्सर यासारख्या वैशिष्ट्यांसह येतात. या स्कूटर दिल्लीतील सर्व Wroley डीलरशिपवर उपलब्ध आहेत.
Wroley Mars तिघांपैकी सर्वात परवडणारी स्कूटर आहे आणि त्याची किंमत 74,900 रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे 60V/30Ah बॅटरीसह येते. जे एका चार्जवर 90km पेक्षा जास्त श्रेणीचा दावा करते. मागील चाकाच्या हबच्या आत 250W BLDC मोटर आहे आणि स्कूटरचा कमाल वेग 25kmph आहे. स्कूटर 10-इंच चाकांसह येते आणि सीटची उंची 640 मिमी आहे. यात 5-इंचाचा LED MID देखील मिळतो आणि तो चार कलरमध्ये खरेदी करण्याचा चांगला ऑप्शन आहे.
कंपनीने लॉन्च केलेल्या इतर दोन स्कूटर्स प्लॅटिना (platina) आणि पॉश (posh) आहेत. ते mars सारखीच बॅटरी आणि मॉडेलसुद्धा सेम आहेत. दुसरीकडे, Platina ची किंमत 76,400 रुपये आहे. mars आणि platina च्या तुलनेत posh सर्वात महाग आहे. त्याची किंमत सुमारे 78,900 रुपये आहे. या सर्व स्कूटरच्या किंमती एक्स शोरूमनुसार आहेत. तिन्ही स्कूटर्सना समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर्स आहेत. या स्कूटरच्या पुढच्या चाकावर डिस्क ब्रेक देखील आढळू शकतात तर मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतात.
तिन्ही स्कूटरचे वैशिष्ट्य सारखे असले तरी ते त्यांच्या डिझाइन आणि स्टाईलच्या बाबतीत वेगळ्या आहेत. मार्स आणि प्लॅटिना पारंपरिक लूक देतात. तर, पॉश अधिक रेट्रो लूकसाठी ओळखली जाते.
महत्वाच्या बातम्या :