Hybrid Car म्हणजे काय? कशी काम करते ही प्रणाली; सोप्या भाषेत समजून घ्या संपूर्ण माहिती
Hybrid Cars: हायब्रीड कार म्हणजे काय? आणि ही प्रणाली काम कशी करते? या सर्व गोष्टींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
Hybrid Cars: हायब्रीड कार म्हणजे काय? आणि ही प्रणाली काम कशी करते? या सर्व गोष्टींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. परंतु आजकाल भारतात इलेक्ट्रिक वाहनांसोबतच हायब्रीड कार सेगमेंटमधील कार्सही खूप चर्चेत आहेत. हायब्रीड कार म्हणजे इलेक्ट्रिक वाहन आणि इंधन वाहनाचे मिश्रण. ही कार इंधन वाहनापेक्षा चांगले मायलेज देते. Mahindra Alturas G4, Honda City Hybrid 2022 आणि MG Aster ही काही हायब्रीड वाहने ऑटो मार्केटमधील सध्याची प्रमुख वाहने आहेत. याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
हायब्रिड कार प्रणाली काम कसं करते?
दोन मोटर्सने सुसज्ज असलेल्या हायब्रीड कारमध्ये पहिले पेट्रोल इंजिन आहे, जे तुम्हाला सामान्य इंधन इंजिन असलेल्या कारसारखे दिसते. तर दुसरे इलेक्ट्रिक मोटर इंजिन आहे, जे तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पाहायला मिळते. या दोन्ही इंजिनचा उपयोग वाहन चालविण्यासाठी होतो. जेव्हा कार फ्युएल इंजिनमधून चालते, तेव्हा तिच्या बॅटरीलाही पॉवर मिळते, त्यामुळे बॅटरी आपोआप चार्ज होते आणि गरजेच्या वेळी अतिरिक्त पॉवर म्हणून हे इंजिन वापरले जाऊ शकते.
दोन प्रकारची असतात हायब्रीड कार
हायब्रीड कारमध्ये तुम्हाला सीरीज हायब्रिड कार आणि पॅरलल हायब्रीड कार, असे दोन प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. पॅरलल हायब्रीड कारबद्दल बोलायचे तर यामध्ये, कारला इंधन मोटर आणि इलेक्ट्रिक मोटर या दोन्हींमधून उर्जा मिळते. ज्यामुळे ती अधिक कार्यक्षमतेने काम करते. तर सीरिज हायब्रीड कारमध्ये, इंधन मोटर इंजिन मोटर तसेच बॅटरीला पॉवर देते. जेव्हा इंधन इंजिन बंद केले जाते, तेव्हा कारला बॅटरी पॅकमधून उर्जा मिळते.
पेट्रोल कारपेक्षा किफायतशीर
सामान्य पेट्रोल कारच्या तुलनेत हायब्रिड कार खूप किफायतशीर आहेत. याचे कारण पेट्रोल कारच्या तुलनेत हायब्रीड कारची रनिंग कॉस्ट कमी आहे. तसेच हायब्रिड कारचे इंजिन कठीण संरचनेचे बनलेले आहे. जर यात बिघाड झाला तर याचा दुरुस्ती खर्च जास्त आहे. दरम्यान, भारतात Honda City Hybrid, Toyota Glanza, Porsche, MG Hector, Lexus ES, Volvo XC90 आणि BMW 7 या हायब्रिड कार उपलब्ध आहेत.