Car Care Tips : तु्म्हीही एकाच जागी खूप काळ गाडी लावून ठेवत असाल तर होऊ शकते मोठे नुकसान,घ्या जाणून
तुम्हीही एकाच जागी खूप काळ गाडी लावून ठेवत असाल तर मोठे नुकसान होऊ शकते. तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता.

Tips to Store Your Car For Long Time : तुम्ही तुमची कार किंवा गाडी एकाच जागी लावत असाल तर ही बातमी तुमच्याकरता उपयुक्त आहे. खरं तर, कार एका जागी जास्त वेळ उभी राहिल्यास तुमच्या खिशाला भारी पडू शकते, आम्ही असे म्हणत आहोत कारण जास्त वेळ पार्किंग केल्यामुळे तुमच्या कारचे टायर आणि इतर भाग देखील पूर्णपणे खराब होऊ शकतात. तुम्हालाही तुमचे वाहन अनेक दिवस एकाच ठिकाणी पार्क करावे लागत असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता.
1. वाहन बराच वेळ एकाच जागी उभे राहिल्यास बॅटरी डिस्चार्ज होते. तसेच बॅटरीची क्षमता झपाट्याने कमी होऊ लागते. हे टाळण्यासाठी, किमान 10 दिवसांतून एकदा वाहन सुरू करा ज्यामुळे बॅटरी आणि इंजिन दोन्ही चांगले टिकेल.
2. वाहन एकाच ठिकाणी जास्त वेळ उभे राहिल्यास त्याचे टायर खराब होते. हे टाळण्यासाठी किमान 15 दिवसात वाहन बाहेर घेऊन जा. यामुळे गाडीचे ब्रेक, क्लच, बॅटरी आणि इंजिन खराब होणार नाही.
3. कारच्या इंजिनच्या भागांची जेवढी काळजी घ्यावी, तेवढीच त्याच्या बाह्य भागाचीही देखभाल केली पाहिजे. तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची कोणतीही कार असली, जेथे लोखंड आहे, तेथे नेहमी गंज लागण्याची शक्यता असते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
