Volvo Electric Car : 418 किमीची 'ही' इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त 50,000 रूपयांत करा बुक; जाणून घ्या डिटेल्स
Volvo Electric Car : या कारला लेव्हल 2 ड्रायव्हिंग सेन्सर आधारित ADAS टेक्नॉलॉजी, पॅनोरॅमिक सनरूफसह Android-आधारित इन्फोटेनमेंट सिस्टम आणि वायरलेस फोन चार्जिंग मिळते.
Volvo XC40 Recharge : लक्झरी कार निर्माता कंपनी Volvo ने अलीकडेच कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार XC40 रिचार्ज लॉन्च केली आहे. कंपनीने 27 जुलैपासून या कारचे बुकिंगही सुरू केले आहे. जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV खरेदी करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून फक्त 50,000 रुपयांमध्ये बुक करू शकता. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची रेंज पूर्ण चार्ज केल्यावर 418 किमी आहे. या कारमध्ये आणखी काय खास आहे ते पाहूया.
Volvo XC40 रिचार्ज किंमत :
भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 55.90 लाख आहे. भारतात ही कार आधीपासून पेट्रोल इंजिनच्या मॉडेलमध्ये आहे. या कारच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटची किंमत तिच्या पेट्रोल व्हेरियंटपेक्षा 11.40 लाख रुपये जास्त आहे. ही भारतातील पहिली अशी लक्झरी ईव्ही असेल, जी स्थानिक पातळीवर एकत्र केली जाईल. कंपनी आपल्या बॅटरीवर आठ वर्षांची वॉरंटी देत आहे.
पॉवरफुल बॅटरी :
Volvo ने या कारमध्ये 78 kWh चा बॅटरी पॅक दिला आहे, जो 150kW च्या DC फास्ट चार्जरने फक्त 33 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. त्याच वेळी, ही कार 50kW फास्ट चार्जरने सुमारे 2.5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. ही कार एका पूर्ण चार्जमध्ये 418 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याची ट्विन मोटर 408hp पॉवर आणि 660Nm पर्यंत टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीचा दावा आहे की ते फक्त 4.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते.
कारचा लूक कसा आहे?
कारच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, 'Thor' प्रमाणेच DRL सह एलईडी हेडलॅम्प्ससह समोरून अतिशय साध्या आणि स्वच्छ डिझाईनमध्ये बनवले गेले आहे. हे त्याच्या पेट्रोल व्हर्जनच्या कारपेक्षा 15 मिमी लांब आहे. यात 19-इंच अलॉय व्हील, ड्युअल-टोन ब्लँक-आउट ग्रिल आणि 452-लिटरची बूट स्पेस मिळते.
ही वैशिष्ट्ये उपलब्ध असतील
कारला लेव्हल 2 ड्रायव्हिंग सेन्सर आधारित ADAS तंत्रज्ञान, पॅनोरामिक सनरूफसह अँड्रॉइड-आधारित इन्फोटेनमेंट सिस्टम आणि वायरलेस फोन चार्जिंग मिळते. यामध्ये ऑनबोर्ड ई-सिमच्या मदतीने गुगल मॅप्स आणि गुगल असिस्टंट आणि गुगल प्लेस्टोअरवरून अनेक अॅप्स थेट ऍक्सेस करता येतात.
महत्वाच्या बातम्या :