एक्स्प्लोर

फक्त 1 रुपयाच्या खर्चात 25 किमी धावेल 'ही' इलेक्ट्रिक सायकल, एका चार्जमध्ये देते 150 किमीची रेंज

Election Cycle: भारतीय बाजारोएथित सध्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात आज अशी अनेक इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जी चांगल्या रेंज आणि फीचर्ससह येते.

Election Cycle: भारतीय बाजारोएथित सध्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात आज अशी अनेक इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जी चांगल्या रेंज आणि फीचर्ससह येते. मात्र आता बाजारात एक अशी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च झाली आहे, जी फक्त 1 रुपयाच्या खर्चात 25 किमी धावते. या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे  'बूटी'. Voltrider या स्टार्टअप कंपनीने ही सायकल लॉन्च केली आहे. याची डिझाइन अशा प्रकारे करण्यात आली आहे की, यात सायकल आणि मोपेड दोन्हीची झलक दिसते. कंपनीने ही सायकल बूटी 120, बूटी 60 आणि बूटी 30 अशा तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. 

बूटी 120 हे टॉप मॉडेल ई-सायकल आहे. ज्यामध्ये कंपनीने 36 Ah बॅटरी पॅक वापरला आहे. यामध्ये रायडरला केवळ बॅटरीवर 90-100 किमी आणि पूर्ण चार्ज केल्यानंतर पेडल असिस्ट मोडवर 130 ते 150 किमीची रेंज मिळवू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने Booty 120 ची किंमत 45,000 रुपये इतकी ठेवली आहे. Booty 60 बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 24 Ah ची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही फक्त बॅटरीच्या पॉवरवर 55 ते 60 किलोमीटर धावू शकते. तसेच पेडल असिस्ट फीचरच्या मदतीने ते 75 ते 80 किलोमीटरपर्यंत चालवता येते. ही ई-सायकल 37,000 रुपये किंमतीत बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
बूटी 30 ही या रेंजमधील एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक सायकल आहे. जी सर्वात कमी किमतीत 30,000 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ई-सायकल केवळ बॅटरीच्या मदतीने 25 ते 30 किमीची रेंज देऊ शकते. तसेच पेडल असिस्ट मोडवर ही 45-50 किलोमीटरपर्यंत चालवले जाऊ शकते. बूटी रेंजमधील सर्व इलेक्ट्रिक सायकलींची आसनक्षमता दोन आहे. प्रवाशाशिवाय ही इलेक्ट्रिक सायकल कुरिअर आणि डिलिव्हरीसाठी देखील वापरली जाऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक सायकल 25 किलोमीटर चालवण्यासाठी फक्त 1 रुपये खर्च येतो. त्यानुसार 100 रुपये प्रति महिना खर्च करून दररोज 100 किलोमीटर चालवता येईल. दरम्यान, सामन्याच्या खिशाला परवडणारी अशी ही इलेक्ट्रिक सायकल आहे. याला बाजारात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget